पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फिनलंडचे  राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद


युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याच्या सध्याच्या प्रयत्नांवर नेत्यांनी केली विचारांची देवाणघेवाण

पंतप्रधान मोदी यांनी शांतता आणि स्थैर्याची लवकर पुनर्स्थापना करण्यासाठी भारताच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचा केला पुनरुच्चार

दोन्ही नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवरही केली चर्चा

Posted On: 27 AUG 2025 8:32PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.

राष्ट्राध्यक्ष स्टब यांनी युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोप, अमेरिका आणि युक्रेनच्या नेत्यांमध्ये वॉशिंग्टनमध्ये झालेल्या अलिकडच्या बैठकींवरील आपले मूल्यांकन पंतप्रधान मोदी यांच्यासमोर मांडले.

पंतप्रधान मोदी यांनी संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण तसेच शांतता आणि स्थैर्याची लवकरच पुनर्स्थापना याबाबत भारताच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.

दोन्ही नेत्यांनी भारत-फिनलंड द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला आणि क्वांटम तंत्रज्ञान, 6जी, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि शाश्वतता यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रात भागीदारी वाढविण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

राष्ट्राध्यक्ष स्टब यांनी परस्पर फायदेशीर असणारा भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी लवकर करण्यासाठी फिनलंडचा पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. भारताने 2026 मध्ये आयोजित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर संमेलनाच्या यशासाठी फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांनी पाठिंबा दर्शविला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती स्टब यांना लवकरात लवकर भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले. दोन्ही नेत्यांनी परस्पर संपर्क कायम राखण्यास संमती दर्शवली.

***

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2161394)