पंतप्रधान कार्यालय
क्षमा, करुणा आणि नम्रतेचे आवाहन करणाऱ्या संवत्सरीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
27 AUG 2025 6:20PM by PIB Mumbai
संवत्सरीच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या असून क्षमा, करुणा आणि प्रामाणिक मानवी संबंध या कालातीत मूल्यांवर भर दिला आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“संवत्सरी ही क्षमाशीलतेच्या सौंदर्याची आणि करुणेच्या शक्तीची आठवण करून देते. ती लोकांना प्रामाणिकपणे बंध जोपासण्याची प्रेरणा देते. या पवित्र प्रसंगाचे औचित्य साधत असताना आपले हृदय नम्रतेने भरून जावो आणि आपल्या कृतींमध्ये दयाळूपणा तसेच सद्भावना प्रतिबिंबित होवो. मिच्छामी दुक्कडम!”
***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2161339)
आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada