पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
युक्रेन तसेच पश्चिम आशियाई भागातील संघर्षावर शांततामय तोडगा काढण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांबाबत दोन्ही नेत्यांनी त्यांची मते व्यक्त केली
लवकरात लवकर शांतता तसेच स्थैर्य प्रस्थापित करण्याला भारताने दर्शवलेल्या निरंतर पाठिंब्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला पुनरुच्चार
भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या मार्गांबाबत दोन्ही नेत्यांची चर्चा
Posted On:
21 AUG 2025 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचा दूरध्वनी आला.
या संवादादरम्यान दोन्ही नेत्यांनी युक्रेन तसेच पश्चिम आशियाई भागातील संघर्षावर शांततामय तोडगा काढण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांबाबत आपापली मते व्यक्त केली.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी युरोप, अमेरिका आणि युक्रेन या देशांच्या नेत्यांशी वॉशिंग्टनमध्ये नुकत्याच झालेल्या भेटींतील निष्कर्ष सामायिक केले. गाझा येथील परिस्थितीबाबतचे स्वतःचे दृष्टीकोन देखील राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सामायिक केले.
संघर्षमय भागात शांततापूर्ण तोडगा काढून तेथे लवकरात लवकर शांतता तसेच स्थैर्य प्रस्थापित करण्याला भारताने दर्शवलेल्या निरंतर पाठिंब्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
भारत आणि फ्रान्स या देशांदरम्यान व्यापार, संरक्षण, नागरी अणु सहकार्य, तंत्रज्ञान तसेच उर्जा या क्षेत्रांसह द्विपक्षीय सहकार्य कार्यक्रमातील प्रगतीचा या नेत्यांनी आढावा घेतला. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याप्रती आणि 2026 हे वर्ष ‘नवोन्मेषाचे वर्ष’ म्हणून सुयोग्य पद्धतीने साजरे करण्याप्रती संयुक्त वचनबद्धतेला त्यांनी दुजोरा दिला.
भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करण्यासाठी देखील राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पाठींबा व्यक्त केला.
सर्व मुद्द्यांसंदर्भात एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2159453)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada