रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टोल प्लाझावर दुचाकी वाहनांकडून वापरकर्ता शुल्क वसूल करण्याबाबतच्या बोगस बातम्यांसंदर्भात स्पष्टीकरण

Posted On: 21 AUG 2025 3:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2025

टोल प्लाझावर दुचाकी वाहनांकडून पथकर वसूल करण्याबाबत समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या खोट्या बातम्यांच्या संदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे स्पष्ट करू इच्छिते की देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गांवरील टोल प्लाझावर दुचाकी वाहनांकडून कोणतेही वापरकर्ता शुल्क आकारले जात नाही.

राष्ट्रीय महामार्गांवरील वापरकर्ता शुल्क हे राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम, 2008 प्रमाणेच आकारले जाते आणि दुचाकी वाहनांवर पथकर आकारण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या नाही.

नियमांनुसार टोल प्लाझावर चार किंवा त्याहून अधिक चाकांच्या वाहनांकडून वापरकर्ता शुल्क आकारले जाते ज्यामध्ये कार, जीप, व्हॅन किंवा हलके मोटार वाहन / हलके व्यावसायिक वाहन, हलके माल वाहन किंवा मिनी बस / बस किंवा ट्रक / अवजड बांधकाम यंत्रसामग्री (एचसीएम) किंवा अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट (ईएमई) किंवा मल्टी एक्सल वेहिकल (एम ए व्ही) (तीन ते सहा एक्सल) / अवजड वाहने (सात किंवा त्याहून अधिक एक्सल) यांचा समावेश आहे.

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2159015)