राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय परराष्ट्र सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट


आपले राजनैतिक प्रयत्न, आपल्या देशांतर्गत गरजांशी आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्‍याच्या उद्दिष्टाशी समांतर असले पाहिजेत : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रविष्टि तिथि: 19 AUG 2025 3:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2025

भारतीय परराष्ट्र सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी (2024 ची तुकडी ) आज (19 ऑगस्ट, 2025) राष्ट्रपती भवनात  राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

अधिकाऱ्यांना संबोधित करताना, राष्ट्रपतींनी भारतीय परराष्ट्र सेवेत सामील झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की, अधिकारी वर्गाने आपल्या कार्यप्रवासात आपली संस्कृती, ज्ञानाची मूल्ये - शांतता, बहुलवाद, अहिंसा आणि संवाद – या गोष्‍टींची सातत्याने साथसंगत ठेवावी आणि पुढे जावे.  याबरोबरच  आपल्या कार्यप्रवासामध्‍ये भेटणाऱ्या  प्रत्येक संस्कृतीतील विचार, लोक आणि दृष्टिकोन याकडे खुल्या मनाने पाहिले पाहिजे. राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू  म्हणाल्या की,  आपल्या सर्वांच्या  सभोवतालच्या विश्‍वात  भू-राजकीय बदल, डिजिटल क्रांती, हवामान बदल आणि बहुपक्षीय वाद, यामध्‍ये  खूप वेगाने स्थित्यंतरे घडून येत असलेली  दिसत आहेत. तरुण अधिकारी वर्गाने चपळतेने  नवनवे बदल स्‍वीकारणे,हीच यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  म्हणाल्या  की, आज भारत हा जगातील मुख्य आव्हानांना उत्तरे देऊन त्या समस्यांचे  निराकरण करण्‍यामध्‍ये  एक महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे - मग ते उत्तर आणि दक्षिण अशा जागतिक असमानतेमुळे उद्भवणारे प्रश्न असोत, सीमापार दहशतवादाचे धोके असोत किंवा हवामान बदलाचे परिणाम असोत. भारत हा केवळ जगातील सर्वात मोठा लोकशाही देश नाही,  तर सतत वाढत जाणारी आर्थिक शक्ती देखील आहे. आमच्या आवाजाला वजन आहे. राजनयिक पदावरील व्यक्ती म्हणून, आयएफएस अधिकारी यांचाच भारताचा पहिला चेहरा जगासमोर येत असतो - त्यांच्या शब्दांतून, कृतीमधून  आणि मूल्यांमधून  परदेशामध्‍ये लोक भारताची प्रतिमा तयार करीत असतात.

याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  आजच्या काळात सांस्कृतिक राजनैतिकतेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की,  हृदय आणि आत्म्याद्वारे निर्माण झालेले संबंध नेहमीच मजबूत असतात. योग, आयुर्वेद आणि त्याचबरोबर भरड धान्य (श्रीअन्‍न)असो किंवा भारताच्या संगीत, कलात्मक, भाषिक आणि आध्यात्मिक परंपरा असोत, परदेशामध्‍ये  या विशाल वारशाचे प्रदर्शन आणि प्रचार देशाच्या  परराष्‍ट्र अधिकारी वर्गाकडून अधिक सर्जनशील आणि महत्त्वाकांक्षी प्रयत्न केले जावेत.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आपले राजनैतिक प्रयत्न आपल्या देशांतर्गत गरजांशी आणि 2047  पर्यंत विकसित भारत बनण्याच्या आपल्या उद्दिष्टांशी समांतर असले  पाहिजेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  तरुण अधिकाऱ्यांना केवळ भारताच्या हिताचे रक्षक म्हणून नाही  तर देशाच्या  आत्म्याचे राजदूत म्हणून स्वतःला पाहण्याचे आवाहन केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे.


शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2157907) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam