राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करणार
Posted On:
13 AUG 2025 8:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उद्या (14 ऑगस्ट 2025) 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करतील.
हे संबोधन सायंकाळी 7 वाजल्यापासून आकाशवाणीच्या संपूर्ण राष्ट्रीय जाळ्यावर प्रसारित करण्यात येईल तसेच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदीत आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये प्रसारित केले जाईल. दूरदर्शनवर हिंदी व इंग्रजी प्रसारणानंतर प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांतील प्रसारण केले जाईल. तसेच आकाशवाणी आपल्या प्रादेशिक जाळ्यांवर रात्री साडेनऊ वाजता प्रादेशिक भाषांमध्ये याचे प्रसारण करेल.
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156183)