पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद


राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनशी संबंधित अलीकडच्या घडामोडींबाबत आपले विचार व्यक्त केले

संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या बाबतीत भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा तसेच लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रयत्नांना पाठींबा असल्याचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार

दोन्ही नेत्यांनी भारत-युक्रेन द्विपक्षीय भागीदारीच्या प्रगतीचा घेतला आढावा

प्रविष्टि तिथि: 11 AUG 2025 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2025 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

युक्रेनशी संबंधित अलीकडच्या काळातील घडामोडींबाबत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्वतःचे विचार सामायिक केले. 

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानले आणि युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या बाबतीत भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेची तसेच लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रयत्नांना पाठींबा असल्याची ग्वाही दिली. या संदर्भात सर्वतोपरी मदत करण्याप्रती बांधिलकीचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

दोन्ही नेत्यांनी भारत-युक्रेन द्विपक्षीय भागीदारीच्या प्रगतीचा आढावा देखील घेतला आणि परस्पर हिताच्या  क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वाढवण्याच्या मार्गांची चर्चा केली.

दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली.

 

* * *

निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2155307) आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam