माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सर्जनशील स्वातंत्र्याप्रति वचनबद्धतेचा सरकारचा पुनरुच्चार, आयटी नियम, 2021 द्वारे ओटीटी देखरेख यंत्रणा लागू, ओटीटी कंटेंटचे नियमन करण्यासाठी स्थापन केली त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा

Posted On: 06 AUG 2025 5:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025

सर्जनशीलता स्वातंत्र्य आणि ओटीटी नियमन:

संविधानाच्या कलम 19 अंतर्गत सर्जनशीलता स्वातंत्र्यासह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात आले आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हानिकारक आशयाच्या  नकारात्मक परिणामांचा सामना करण्यासाठी, सरकारने 25.02.2021 रोजी आयटी कायदा, 2000 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया, नीतिमत्ता संहिता) नियम, 2021 अधिसूचित केले आहेत.

नियमांच्या भाग-III मध्ये डिजिटल बातम्या प्रकाशक आणि ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट (ओटीटी  प्लॅटफॉर्म) च्या प्रकाशकांसाठी आचारसंहितेची तरतूद आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या लागू असलेल्या कायद्याने प्रतिबंधित असलेला कोणताही कंटेंट प्रसारित न करणे बंधनकारक आहे.

हे नियम पुढील प्रमाणे त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा प्रदान करतात:

स्तर I: प्रकाशकांकडून स्व-नियमन.

स्तर II: प्रकाशकांच्या स्वयं-नियमन संस्थांद्वारे स्वयं-नियमन.

स्तर III: केंद्र सरकारची देखरेख यंत्रणा.

मंत्रालयाला प्राप्त झालेल्या तक्रारी आयटी नियम, 2021 अनुसार निराकरणासाठी संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मकडे पाठवल्या जातात.

संबंधित मंत्रालयांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर, सरकारने अश्लील सामग्री प्रदर्शित केल्याबद्दल 43 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.

सरकारी जाहिराती :

सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (सीबीसी) वृत्तपत्रे, टीव्ही / रेडिओ, आऊटडोअर, डिजिटल मीडिया यासह विविध माध्यम व्यासपीठांवर  भारत सरकारच्या जाहिराती प्रसिद्ध  करते.

इच्छित संदेशाचे व्यापक कव्हरेज  सुनिश्चित करण्यासाठी, मुद्रित, दृक-श्राव्य,   डिजिटल, बाह्य प्रसिद्धी इत्यादी विविध माध्यमांच्या संदर्भात तपशीलवार धोरण मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे सीबीसीच्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत: cbcindia.gov.in.

एव्हीजीसी-एक्सआर (AVGC-XR) क्षेत्राला प्रोत्साहन:

एव्हीजीसी-एक्सआरमध्ये अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि विस्तारित  रिअॅलिटी सेक्टरचा समावेश आहे.

एव्हीजीसी क्षेत्रासाठी सरकारचे महत्त्वाचे उपक्रम खालीलप्रमाणे आहेत:

जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद 2025

  • भारताला माध्यम आणि मनोरंजनाचे जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्यासाठी 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत आयोजित.
  • क्रिएट इन इंडिया चॅलेंज: ॲनिमेशन, गेमिंग, एआर/व्हीआर आणि संगीत यासारख्या 34 सर्जनशील श्रेणींमध्ये पुढच्या पिढीच्या सर्जनशील प्रतिभेचा देशव्यापी शोध. जगभरातील निर्मात्यांकडून 1 लाखाहून अधिक नोंदणी झाली.
  • निर्मात्यांना गुंतवणूकदारांशी जोडणारे आणि बाजारपेठांमध्ये व्यापक प्रवेश आणि मार्गदर्शन उपलब्ध करणारे वेव्हज बाजार, वेव्हएक्स अ‍ॅक्सिलरेटर यासारखे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम  
  • स्टोरीटेलिंग, एआय, एक्सआर आणि डिजिटल कंटेंट निर्मितीमध्ये मास्टरक्लासेस आणि मार्गदर्शन प्रदान केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजची (आयआयसीटी) स्थापना

उद्योग-केंद्रित अभ्यासक्रम आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींवर लक्ष केंद्रित करून सर्जनशील तंत्रज्ञानासाठी एक प्रमुख संस्था म्हणून आयआयसीटीची स्थापना करण्यात आली आहे.

  • आय आय सी टीच्या विकास आणि संचालनासाठी 392.85 कोटी रुपये तरतूद  करण्यात आली आहे.
  • आय आय सीटी हे सर्जनशील तंत्रज्ञानासाठी आय आय टी आणि आय आय एम च्या धर्तीवर तयार केले गेले आहे.
  • शैक्षणिक सहकार्यासाठी Google, Meta, NVIDIA, Microsoft, Apple, Adobe, WPP इत्यादी प्रमुख जागतिक कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत.
  • आय आय सी टी AVGC-XR डोमेनमध्ये व्यावसायिक आणि प्रशिक्षकांसाठी प्रगत प्रशिक्षण प्रदान करते.
  • आरंभिक शैक्षणिक प्रस्तावात गेमिंगमधील चार विशेष अभ्यासक्रम, पोस्ट प्रॉडक्शनमधील चार अभ्यासक्रम आणि ॲनिमेशन, कॉमिक्स आणि एक्सआरमधील नऊ अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
  • अधिक माहिती https://theiict.in वेबसाइटवर उपलब्ध आहे.

 ही माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सादर केली.

सुषमा काणे/राजश्री आगाशे/नंदिनी मथुरे /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2153146)