पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर.मार्कोस ज्युनियर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

Posted On: 05 AUG 2025 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2025

महामहीम 

आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या द्विपक्षीय संबंधांच्यासंदर्भात एक ऐतिहासिक दिवस आहे. आपण भारत-फिलिपिन्स संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर घेऊन जात आहोत. यामुळे आपल्या संबंधांना एक नवीन गती आणि सघनता मिळेल. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील आपल्या संबंधांना बळ मिळेल. गेल्या काही वर्षांत, आपल्या एकमेकांच्या सर्व क्षेत्रातील संबंधांमध्ये प्रगती झाली आहे. यामध्ये व्यापार, संरक्षण, सागरी, आरोग्य, सुरक्षा, अन्न सुरक्षा, विकास भागीदारी आणि नागरीकांना एकमेकांविषयीचा असलेला जिव्हाळा यांचा समावेश आहे. आज आपण पुढील पाच वर्षांसाठी एक कृती आराखडा बनवत आहोत ही खूप आनंदाची बाब आहे.

महामहीम,

फिलीपिन्स हा जुलै 2027 पर्यंत आसियानमधील  भारताचा समन्वयक देश आहे. 2026 मध्ये आपण आसियान अध्यक्षपदाची जबाबदारी देखील स्वीकाराल. आम्हाला विश्वास आहे, की फिलीपिन्सच्या नेतृत्वाअंतर्गत भारत-आसियान संबंध अधिक मजबूत होतील.

महामहीम,

तसे पहाता,जेव्हा आपण एकत्र जमलो होतो, तेव्हा जवळजवळ सर्व विषयांवर आपली सविस्तर चर्चा झाली होती. म्हणून, मी त्याची पुनरावृत्ती करू इच्छित नाही, ते पुन्हा करण्याची गरज नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की तुमचे  बीजभाषण हे सर्व विषय पुढे नेण्यासाठी आम्हाला उपयुक्त ठरेल.


जयदेवी पुजारी स्वामी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2153011)