पंतप्रधान कार्यालय
प्रमिलाताई मेढे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
31 JUL 2025 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2025
राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका राहिलेल्या प्रमिलाताई मेढे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त शोक व्यक्त केला आहे. त्यांचे अनुकरणीय जीवन भावी पिढ्यांसाठी, विशेषतः सर्वसमावेशक सामाजिक विकास आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ असल्याचे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :
राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका राहिलेल्या आदरणीय प्रमिलाताई मेढे यांच्या देहावसानामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन समाज आणि राष्ट्रसेवेला समर्पित होते. महिला सक्षमीकरणासोबतच सामाजिक कार्यांमधील त्यांच्या अमूल्य योगदानाचे सदैव स्मरण केले जाईल. या शोकाकुल प्रसंगी परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना बळ देवो. ओम शांती!
सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2151064)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam