पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पवित्र पिप्रहवा अवशेषांचे 127 वर्षांनंतर पुनरागमन झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी केले स्वागत

Posted On: 30 JUL 2025 5:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025

 

भगवान बुद्धांच्या पवित्र पिप्रहवा अवशेषांचे 127 वर्षांनंतर आज भारतात पुनरागमन झाले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले असून हा देशाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीने अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांनी ‘विकास भी विरासत भी’ ही भावना प्रदर्शित करणाऱ्या निवेदनात भारतात भगवान बुद्धांच्या शिकवणींबद्दल असलेली अपार श्रद्धा आणि आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याप्रती देशाची दृढ वचनबद्धता अधोरेखित केली आहे.

या संदर्भात X समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये, मोदी म्हणतात:

“आपल्या सांस्कृतिक वारशासाठी एक आनंदाचा दिवस! 

भगवान बुद्धांचे पवित्र पिप्रहवा अवशेष 127 वर्षांनंतर परत आले ही गोष्ट प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी आहे. हे पवित्र अवशेष भगवान बुद्ध आणि त्यांच्या उदात्त शिकवणींशी असलेला भारताचा  घनिष्ठ संबंध अधोरेखित करणारे आहेत. आपल्या गौरवशाली संस्कृतीच्या विविध पैलूंचे जतन आणि संरक्षण करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचे देखील हे द्योतक आहे.  #VikasBhiVirasatBhi”

"पिप्रहवा अवशेष 1898 मध्ये सापडले होते तरी ते वसाहतवादी राजवटीच्या काळात भारतातून बाहेर  नेण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा ते एका आंतरराष्ट्रीय लिलावात दिसले तेव्हा ते पुन्हा मायदेशी आणले जातील यासाठी प्रयत्न केले गेले. या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या  प्रत्येकाचे मी कौतुक करतो."

 

* * *

निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2150304)