कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम किसान सन्मान निधी हप्त्याच्या वितरण कार्यक्रमात सहभागी होण्याचे केंद्रीय मंत्री


पीएम किसान सन्मान निधी हप्त्याच्या वितरण कार्यक्रमात सहभागी होण्याचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे शेतकऱ्यांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी वाराणसी येथून 20 वा हप्ता करणार जारी

Posted On: 30 JUL 2025 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याचे वितरण 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात आज एक उच्चस्तरीय बैठक घेतली आणि देशभरातील शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ संदेश देखील त्यांनी जारी केला.

“प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना शुभेच्छा. खरीप हंगाम चांगला होण्याची अपेक्षा आहे. आणखी एक आनंदाची बातमी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पीएम -किसान सन्मान निधीची रक्कम थेट तुमच्या खात्यात हस्तांतरित करतील. ते तुम्हाला यावेळी मार्गदर्शनही करणार आहेत.2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमांपैकी एका कार्यक्रमात तुम्ही सर्व सामील व्हा अशी माझी विनंती आहे. हे कार्यक्रम तुमच्या गावांमध्ये, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये (केव्हीके), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) संस्थांमध्ये, कृषी विद्यापीठांमध्ये, मार्केट यार्डमध्ये आणि प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) मुख्यालयात होतील. तुमच्या नजीक असलेले कार्यक्रम स्थळ शोधून उपस्थित रहा आणि पंतप्रधानांचे भाषण ऐका. मी खात्रीने उपस्थित राहणार असून मी तुम्हालाही उपस्थित राहण्याचे आवाहन करतो. धन्यवाद”, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

 

* * *

निलिमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2150224)