दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी बीएसएनएलच्या कामगिरीचा घेतला आढावा, ग्राहक अनुभव आणि महसूल निर्मिती सुधारण्यावर दिला भर

Posted On: 28 JUL 2025 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2025

 

केंद्रीय दळणवळण मंत्री  ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत संचार भवन येथे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या मुख्य महाव्यवस्थापकांसोबत आढावा बैठक झाली.  या उच्चस्तरीय बैठकीत बीएसएनएलच्या कामकाजातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच प्रादेशिक आव्हानांवर चर्चा  करण्यात आली आणि कंपनीचे नेटवर्क आणि सेवा वितरणासाठी पुढील रणनीतीची रूपरेषा  आखण्यात आली. यावेळी दळणवळण  राज्यमंत्री  पेम्मासनी चंद्र शेखर आणि दूरसंचार विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. या सत्रांदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत सिंधिया यांनी नमूद केले की दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएलची भूमिका मजबूत करणे, पायाभूत सुविधांच्या निर्मितीला  गती देणे आणि नागरिक-केंद्रित सेवा वितरण वाढवणे यावर प्रामुख्याने चर्चा केंद्रित होती.

   

विकास आणि आधुनिकीकरणावर भर

आढावा बैठकीदरम्यान बीएसएनएलचे विकासाचे धोरण, नेटवर्क कामगिरी आणि ग्राहक सेवा वितरण सुधारण्यावर तसेच संघटनात्मक आधुनिकीकरणावर व्यापक चर्चा झाली.

ग्राहक-प्रथम परिवर्तन

बीएसएनएल त्याच्या सर्व परिमंडळांमध्ये, व्यवसाय क्षेत्रांमध्ये आणि युनिट्समध्ये मोठ्या प्रमाणात सेवा परिवर्तन करत आहे. "ग्राहक प्रथम" या तत्त्वांवर भर देत बीएसएनएल ग्राहकांचा सक्रिय सहभाग, सुधारित सेवा प्रतिसाद आणि त्वरित तक्रार निवारण यावर भर देण्यासाठी पुढाकार घेत  आहे.

प्रमुख लक्षित क्षेत्रे आणि परिणाम

मुख्य महाव्यवस्थापकांच्या बैठकीत, बीएसएनएलच्या परिमंडळ प्रमुखांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सेवा गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक प्राधान्य क्षेत्रांबाबत माहिती देण्यात आली आणि त्यांचे संरेखन करण्यात आले. चिन्हित  विशेष लक्षित  क्षेत्रांमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत:

  • ग्रामीण, शहरी, उद्योग आणि किरकोळ क्षेत्रातील ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधणे
  • मोबाइल नेटवर्क आणि फायबर-टू-द-होम (FTTH) मध्ये सेवेची गुणवत्ता सुधारणे
  • बिलिंग, प्रोव्हिजनिंग आणि नेटवर्क अपटाइममध्ये  ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करणे
  • प्रत्येक परिचालन स्तरावर "महसूल-प्रथम" लक्ष्यांसह दायित्वाला चालना देणे
  • कनेक्टिव्हिटीसारख्या उद्योग  सेवांचा विस्तार करणे

सिंधिया यांनी बीएसएनएलच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ग्राहकांचा  अनुभव आणि महसूल निर्मितीमध्ये लक्षणीय सुधारणा साध्य करण्याच्या महत्त्वावर भर दिला.

   

नवीन सेवा उपक्रम

आढाव्याचा एक भाग म्हणून, बीएसएनएलने अलीकडेच सुरू केलेल्या अनेक नवीन उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला, ज्याचा उद्देश सेवा वितरण  आणि ग्राहक मूल्य सुधारणे हा  आहे. या उपक्रमांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:

  • विविध दूरसंचार मंडळांमध्ये 4G विस्तार आणि प्रारंभ
  • पुढील पिढीच्या इन्फोटेनमेंटसाठी मोबाइल ग्राहक प्लॅटफॉर्मसाठी FTTH आणि BiTV साठी IFTV ची सुरुवात 
  • बीएसएनएल राष्ट्रीय वाय-फाय रोमिंग (ग्राहकांसाठी देशव्यापी वाय-फाय रोमिंग सेवा)
  • उद्योग आणि सरकारी ग्राहकांसाठी अनुकूलित बीएसएनएल व्हीपीएन सेवा आणि एकत्रित पॅकेजेस
  • स्पॅम-फ्री नेटवर्क — वास्तविक वेळेत घोटाळा आणि स्पॅम संप्रेषण दूर करण्यासाठी अशा प्रकारचा  पहिलाच उपाय
  • बीबीए (बीएसएनएल बिझनेस असोसिएट) साठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे सुशिक्षित तरुणांना बीएसएनएल विक्री चॅनेल मजबूत करण्यास आणि सेल्स कमिशन मिळविण्यास सक्षम केले आहे.

डिजिटली सक्षम भारताच्या दिशेने मार्गक्रमण

अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित करून, बीएसएनएल आता डिजिटली सशक्त, सेवाभिमुख आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत दूरसंचार ऑपरेटर बनण्यासाठी जोमाने  प्रयत्न करत आहे.  देशभरात आधुनिक दूरसंचार सेवा आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करून "भारत" ला जोडण्यासाठी आणि सक्षम बनवण्यासाठी कंपनी वचनबद्ध आहे.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2149304) Visitor Counter : 2