राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या पदाचा 3 वर्षांचा कार्यकाळ केला पूर्ण, यानिमित्ताने  राष्ट्रपती भवनात विविध उपक्रमांचा प्रारंभ


Posted On: 25 JUL 2025 3:33PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 जुलै 2025) आपल्या पदाचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या कार्यकाळाची तिसरी वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपती भवन आणि प्रेसिडेंट इस्टेट  आयोजित विविध महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये त्या सहभागी झाल्या. यात खाली उपक्रमांचा अंतर्भाव होता :

दिव्यांगजनस्नेही राष्ट्रपती निवासस्थानाची घोषणा केली गेली. पं. दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय दिव्यांग संस्थेने केलेल्या 50 कलमी शिफारशींची अंमलबजावणी केल्यानंतर, राष्ट्रपती भवन, अमृत उद्यान आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय हे सर्व परिसर दिव्यांगजनस्नेही परिसर बनले आहेत.

22 भारतीय भाषांमधील राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळाचा प्रारंभ केला गेला. याअंतर्गत https://www.rashtrapatibhavan.gov.in/  आणि https://www.presidentofindia.gov.in/  – ही राष्ट्रपती भवनाची अधिकृत संकेतस्थळे आता 22 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झाली आहेत.

अभ्यागत आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानातील लोकांसाठी विविध सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. याअंतर्गत राष्ट्रपती भवनातील अभ्यागत सुविधा केंद्र , हैदराबाद इथले राष्ट्रपती निलयममधील निलयम निकुंज, मशोब्रा इथल्या राष्ट्रपती निवासमधील उपहारगृह, स्मृती वस्तुंचे दुकान (Souvenir Shop) आणि स्वागत कक्ष तसेच राष्ट्रपती निवासस्थानातील नूतनीकृत व्यायामशाळा यांसारख्या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.

250 पेक्षा जास्त वस्तूंचा लिलाव करण्यासाठी ई-उपहार सीझन 2 चा प्रारंभ केला गेला. लिलावातून मिळणारे सर्व उत्पन्न बाल कल्याणाचे काम करणाऱ्या उपक्रमांना दान दिले जाईल, अशी घोषणा केली गेली. याविषयीचे अधिक तपशील https://upahaar.rashtrapatibhavan.gov.in/  या दुव्यावर पाहता येतील.

गेल्या एका वर्षभरात राष्ट्रपतींनी केलेल्या कामाचे तपशील आणि क्षणचित्रांचे संकलन असलेले ई-पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. हे ई-पुस्तक https://rb.nic.in/ebook25.htm  या दुव्यावर उपलब्ध करून दिले गेले.

मार्च 2027 पर्यंत राष्ट्रपती भवनाला शून्य उत्सर्जन परिसर बनवण्यासाठीच्या उपक्रमांचा प्रारंभ केला गेला.

विविध उपक्रमांच्या प्रारंभाच्या निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमाला राष्ट्रपतींनी संबोधितही केले. गेल्या तीन वर्षांत घेतलेले अनेक निर्णय आणि केलेल्या कामांमुळे नागरिकांचा राष्ट्रपती भवनाशी असलेला संबंध वाढल्याचे पाहून आपल्याला समाधान वाटत असल्याची भावना राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली. समाजातील सर्व घटकांना, विशेषतः वंचित आणि मागास वर्गांना देशाच्या विकासाच्या वाटचालीसोबत परिणामकारकतेने जोडून घेण्याचा आपला प्रयत्न राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगजनांच्या वावर आणि वापराच्या दृष्टीने राष्ट्रपती भवन अधिक सुलभ झाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या काळात विविध नवीन उपक्रम हाती घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***

निलिमा चितळे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2148555)