पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) कंपनीने झोजिला बोगद्याच्या बांधकामासाठी 31,000 टनांहून अधिक पुरवले पोलाद; ‘सेल’च्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे भक्कम राष्ट्र उभारणी

Posted On: 21 JUL 2025 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जुलै 2025

भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) ही देशातील सर्वात मोठी महारत्न श्रेणीची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेली पोलाद निर्मिती कंपनी, प्रतिष्ठित झोजिला बोगदा उभारणी प्रकल्पासाठी सर्वात मोठी एकल पोलाद पुरवठादार म्हणून उदयाला आली आहे. बांधकाम अवस्थेत असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे भारतातील सर्वाधिक लांबीचा रस्तेमार्गावरील बोगदा आणि आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा दोन-दिशा बोगदा असणार आहे.

टीएमटी रि-बार्स,स्ट्रक्चरल्स आणि प्लेट्स यांसाठी आवश्यक पोलादासह या बोगद्याच्या बांधकामासाठी एकूण 31,000 टन पोलादाचा पुरवठा करून सेल कंपनी या धोरणात्मक पायाभूत सुविधा प्रकल्पात महत्वाचा भागीदार ठरली आहे. 2027 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार असून त्या दिशेने वाटचाल करताना कंपनीतर्फे केला जात असलेला पोलादाचा सातत्यपूर्ण पुरवठा या कंपनीची अढळ कटिबद्धता अधोरेखित करतो. झोजिला बोगद्याच्या उभारणीत सेल कंपनीचे हे योगदान कंपनीच्या राष्ट्र उभारणीच्या दीर्घकालीन वारशाला आणखी बळकट करते.झोजिला बोगद्यासारखे महा-प्रकल्प सेल कंपनीच्या पोलादाची विश्वासार्हता आणि मजबुती यांच्यावर सातत्याने विश्वास ठेवत आले आहेत, पोलादाच्या दर्जाप्रती कंपनीची समर्पित वृत्ती आणि भारताचे भविष्य घडवण्यात कंपनीची महत्त्वाची भूमिका याचाच हा पुरावा आहे.  

धोरणात्मकरित्या समुद्रसपाटीपासून 11,578 फुट उंचीवर बांधण्यात येत असलेला हा बोगदा हिमालयातील आव्हानात्मक प्रदेशात उभारण्यात येत आहे. 30 किलोमीटरहून अधिक लांबीचा हा बोगदा संपूर्ण वर्षभर द्रास आणि कारगिल मार्गे श्रीनगर आणि लेह दरम्यानचा संपर्क कायम राखेल. सदर बोगदा भारताच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा विकासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, विशेषतः श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गासाठी तो खूप महत्त्वाचा असून या बोगद्यामुळे त्या भागात नागारिक आणि सैन्याच्या हालचालींमध्ये लक्षणीय सुधारणा होईल.

हा प्रकल्प म्हणजे केवळ धोरणात्मक पायाभूत सुविधा मालमत्ता नसून तो त्या भागातील लक्षणीय आर्थिक संधीचे देखील प्रतिनिधित्व करतो. झोजिला बोगद्याच्या प्रकल्पात सेल कंपनीचे योगदान देशातील चिनाब रेल्वे पूल, अटल बोगदा, वांद्रे-वरळी सी-लिंक तसेच धोला सदिया आणि बोगीबीळ पूल यांसारख्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांना पाठबळ पुरवण्याच्या विस्तृत वारशात अधिक भर घालते.

सुवर्णा बेडेकर/संजना ‍चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2146347)