पंतप्रधान कार्यालय
कौशल्य भारत अभियानाच्या माध्यमातून कुशल आणि आत्मनिर्भर युवा शक्ती घडवण्यासाठी केंद्र सरकारची दृढ वचनबद्धता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा केली व्यक्त
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2025 10:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2025
कौशल्य भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या अभियानाच्या माध्यमातून कुशल आणि आत्मनिर्भर युवा शक्ती घडवण्यासाठी केंद्र सरकारची दृढ वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. कौशल्य भारत अभियान हा एक परिवर्तनकारी उपक्रम असून, हा उपक्रम देशभरातील लाखो लोकांना सक्षम करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी MyGovIndia आणि केंद्रीय मंत्री जयंत सिंह यांच्या X या समाज माध्यमावरील संदेशांवर दिलेला प्रतिसाद :
कौशल्य भारत आपल्या युवा वर्गाला कुशल आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला बळकटी देत आहे.
#SkillIndiaAt10”
''कौशल्य भारत उपक्रमाचा असंख्य लोकांना लाभ मिळत असून, त्यांचे नवीन कौशल्यांनी सक्षमीकरण होत आहे, तसेच नव्या संधीही निर्माण केल्या जात आहेत. येत्या काळातही, आपण आपल्या युवा शक्तीला सर्वोत्तम जागतिक पद्धतींशी सुसंगत नवीन कौशल्ये प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करू, जेणेकरून आपण विकसित भारताचे आपले स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकू.
#SkillIndiaAt10”
* * *
सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2145063)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam