माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजने ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या तुकडीसाठी एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील अत्याधुनिक अभ्यासक्रमांची घोषणा केली

Posted On: 15 JUL 2025 4:00PM by PIB Mumbai

मुंबई, 15 जुलै 2025

 

भारताची वाढती डिजिटल आणि सर्जनशील अर्थव्यवस्था एक परिवर्तनकारी झेप घेण्यास सज्ज झाली असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी) येत्या ऑगस्टपासून विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करत आहे. ही संस्था एव्हीजीसी-एक्सआर (अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि वर्धित वास्तव) क्षेत्रातील उद्योगांवर आधारित अभ्यासक्रमांची एक मोठी संधी प्रदान करेल.

मुंबईत मे 2025 मध्ये झालेल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्हज मध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलेल्या या संस्थेला प्रतिष्ठित जागतिक भागीदार आणि उद्योग धुरिणांचा पाठिंबा लाभला आहे. या उद्घाटनपर पहिल्या शैक्षणिक पाठ्यक्रमात गेमिंगमधील सहा विशेष अभ्यासक्रम, निर्मिती पश्चात क्षेत्रामधील चार अभ्यासक्रम आणि अॅनिमेशन, कॉमिक्स आणि एक्सआरमधील आठ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे कार्यक्रम उद्योगजगतातील आघाडीच्या कंपन्यांच्या सहकार्याने काळजीपूर्वक विकसित केले असून सातत्याने समृद्ध होत असलेल्या सर्जनशील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरभराटीसाठी आवश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांना मि, मायक्रोसॉफ्ट, एनव्हीआयडीए आणि जिओस्टार सारख्या आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजसोबत दीर्घकालीन सहकार्य करण्यासाठी वचनबद्धता दर्शविली असून त्यामुळे या संस्थेचा पाया अधिकच मजबूत झाला आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे अभ्यासक्रम अधिक सर्वसमावेशी होईल तसेच शिष्यवृत्ती, इंटर्नशिप, स्टार्ट अप इन्क्युबेशन आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणावर उपलब्ध होतील.

जागतिक दर्जाच्या प्रतिभेला प्रोत्साहन देऊन भारताला एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रात जागतिक शक्ती म्हणून नावलौकिक मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे, असे आयआयसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विश्वास देवस्कर यांनी सांगितले. हे अभ्यासक्रम जागतिक मानके लक्षात घेऊन तयार केले असून त्याचवेळी भारताच्या गतिशील सर्जनशील क्षमतेची पाळेमुळे देखील त्यात जोडली आहेत. तपशीलवार अभ्यासक्रम पुढील महिन्यात घोषित केला जाणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजच्या नियामक मंडळात संजय जाजू, विकास खारगे, स्वाती म्हसे, चंद्रजित बॅनर्जी, आशिष कुलकर्णी, मानवेंद्र शुकुल आणि राजन नवानी यांचा समावेश आहे. तर गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांमध्ये मुंजाल श्रॉफ, चैतन्य चिचलीकर, बिरेन घोष, भूपेंद्र कैंथोला आणि गौरव बॅनर्जी यांचा समावेश आहे.

जागतिक पातळीवरील एव्हीजीसी-एक्सआर उद्योग वेगाने प्रगती करण्याचा अंदाज असून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज त्याला अनुसरून सर्वसमावेशक अभ्यासक्रम सादर करून भविष्यासाठी सज्ज प्रतिभा निर्मिती तयार करत आहे. यामाध्यमातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान मिळेल आणि देश सखोल आणि डिजिटल कंटेंट तंत्रज्ञानात अग्रस्थानी विराजमान होईल.

 

* * *

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2144858) Visitor Counter : 2