राष्ट्रपती कार्यालय
गोव्याच्या राज्यपालपदी पुसापति अशोक गजपती राजू यांची नियुक्ती
Posted On:
14 JUL 2025 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लद्दाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
यासोबतच, राष्ट्रपतींनी खालीलप्रमाणे राज्यपाल/नायब राज्यपाल यांची नियुक्ती केली आहे,
- प्रा. अशीम कुमार घोष यांची हरियाणा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- पुसापति अशोक गजपती राजू यांची गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- कविंदर गुप्ता यांची लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वरील नियुक्त्या त्यांच्या संबंधित पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील.
* * *
S.Kakade/R.Dalekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2144622)