पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
Posted On:
09 JUL 2025 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नामीबियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. नामीबियाच्या राष्ट्राध्यक्षा नेटुम्बो नंदी-नदैतवा यांच्या हस्ते आज पंतप्रधानांना नामीबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय नेते ठरले आहेत.
पंतप्रधानांनी हा सन्मान स्वीकारताना तो भारतातील 1.4 अब्ज जनतेचा आणि भारत-नामिबिया यांच्यातील ऐतिहासिक आणि दृढ संबंधांचा सन्मान असल्याचे सांगितले. राष्ट्राध्यक्ष नंदी-नदैतवा आणि नामिबियाच्या जनतेचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले.
पंतप्रधानांना मिळालेला हा सन्मान भारत आणि नामिबिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. दोन्ही देशांतील युवा पिढ्यांसाठी ही एक प्रेरणादायक घटना ठरेल आणि द्विपक्षीय विशेष भागीदारीला अधिक उंचीवर घेऊन जाईल.
S.Bedekar/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143579)
Read this release in:
Odia
,
English
,
Khasi
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam