पंतप्रधान कार्यालय
ब्रिक्स परिषदेच्या अनुषंगाने रिओ दी जानेरो येथे पंतप्रधानांनी बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
Posted On:
07 JUL 2025 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2025
ब्राझीलमध्ये रिओ दी जानिरो येथे आयोजित ब्रिक्स परिषदेच्या अनुषंगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष लुईस आर्से कॅटाकोरा यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आणि साध्य झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी महत्वाची खनिजे, व्यापार आणि वाणिज्य, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि युपीआय, आरोग्य आणि औषधनिर्मिती, पारंपरिक औषधे, लघु आणि मध्यम उद्योग, प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती या क्षेत्रांतील सहकार्याबाबत चर्चा केली.दोन्ही नेत्यांनी महत्त्वाच्या खनिजांच्या क्षेत्रात सहयोग वाढवण्यासाठीच्या तसेच या क्षेत्रात शाश्वत आणि परस्पर लाभदायक भागीदारी विकसित करण्याच्या संधी लक्षात घेतल्या.आयटीईसी शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत क्विक इंपॅक्ट प्रकल्प आणि क्षमता निर्मिती उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या सहकार्यासह दोन्ही देशांदरम्यान सध्या असलेल्या विकासविषयक सहकार्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
बोलिव्हियातील लाझ पाझ आणि देशाच्या इतर अनेक भागांमध्ये मार्च-एप्रिल 2025 मध्ये आलेल्या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलिव्हियाच्या जनतेसोबत सहवेदना व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी बोलिव्हियाचे अभिनंदन देखील केले.
बोलिव्हिया स्वतंत्र झाल्याला 6 ऑगस्ट 2025 रोजी 200 वर्षे पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर देशाच्या द्विशताब्दी सोहोळ्यानिमित्त पंतप्रधानांनी बोलिव्हियाचे सरकार तसेच जनतेला शुभेच्छा दिल्या.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143012)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam