पंतप्रधान कार्यालय
सनदी लेखापाल दिनानिमित्त (Chartered Accountant’s Day) पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी सनदी लेखापालांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 JUL 2025 9:34AM by PIB Mumbai
आजच्या सनदी लेखापाल दिनानिमित्त (Chartered Accountant’s Day) पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी सर्व सनदी लेखापालांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक संस्थेसाठी सनदी लेखापालांची अचूकता आणि तज्ञता अत्यावश्यक असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून अधोरेखित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर लिहिलेला शुभेच्छा संदेश :
"सर्व सनदी लेखापालांना सनदी लेखापाल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! त्यांची अचूकता आणि तज्ञता प्रत्येक संस्थेसाठी अत्यावश्यक असते. नियमांचे पालन आणि पारदर्शकतेला महत्त्व देत, ते एका सशक्त अर्थव्यवस्थेसाठी योगदान देत आहेत. यशस्वी उद्योगांच्या प्रगतीमधील त्यांची भूमिकाही उल्लेखनीय आहे. "
***
JPS/TP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141042)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam