अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन 30 जून ते 5 जुलै 2025 दरम्यान स्पेन, पोर्तुगाल आणि ब्राझीलच्या अधिकृत दौऱ्यावर

Posted On: 30 JUN 2025 11:40AM by PIB Mumbai

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन 30 जून ते 5 जुलै 2025 या कालावधीत स्पेन, पोर्तुगाल आणि ब्राझीलच्या अधिकृत दौऱ्यावर अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या दौऱ्याचा भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री स्पेनमधील सेव्हिल येथे, संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या 'फायनान्सिंग फॉर डेव्हलपमेंट' (FFD4) च्या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहतील आणि भारताच्या वतीने आपले निवेदन सादर करतील.

त्याचबरोबर त्या 'फ्रॉम FFD4 आउटकम टू इम्प्लिमेंटेशन: अनलॉकिंग द पोटेंशिअल ऑफ प्रायव्हेट कॅपिटल फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट'  या विषयावर सेव्हिल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार मंच नेतृत्त्व परिषदेत  प्रमुख भाषण करतील. FFD4 च्या निमित्ताने, निर्मला सीतारामन जर्मनी, पेरू आणि न्यूझीलंडच्या वरिष्ठ मंत्र्यांची तसेच युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (EIB) अध्यक्षांची भेट घेतील.

पोर्तुगालमधील लिस्बन येथे, केंद्रीय अर्थमंत्री पोर्तुगालच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेतील, तसेच प्रमुख गुंतवणूकदार आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील अशी अपेक्षा आहे.

रियो डी जॅनेरो येथे, केंद्रीय अर्थमंत्री न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या (NDB) 10 व्या वार्षिक बैठकीला भारताच्या गव्हर्नर म्हणून संबोधित करतील. तसेच त्या ब्रिक्स अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर (FMCBG) बैठकीलाही उपस्थित राहतील.

न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या (NDB) बैठकींदरम्यान, सीतारामन 'बिल्डिंग अ प्रीमियर मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक फॉर द ग्लोबल साउथ'  या विषयावर आयोजित एनडीबी च्या फ्लॅगशिप गव्हर्नर्स सेमिनारमध्ये आपले विचार व्यक्त करतील. एनडीबीच्या बैठकांच्या निमित्ताने, केंद्रीय अर्थमंत्री ब्राझील, चीन, इंडोनेशिया आणि रशियामधील त्यांच्या समपदस्थांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील.

***

SushamaK/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2140709)