गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 2029च्या प्रतिष्ठित जागतिक पोलिस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेसाठी भारताला यजमानपद मिळाल्याबद्दल केला आनंद व्यक्त
हा प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे काढले गौरवोद्गार
Posted On:
27 JUN 2025 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 2029 च्या प्रतिष्ठित जागतिक पोलिस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेसाठी भारताला यजमानपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि हा प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.
एक्स या समाजमध्यमावरील वरील एका पोस्टमध्ये, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, “प्रत्येक नागरिकासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे, कारण भारताला 2029च्या प्रतिष्ठित जागतिक पोलिस आणि अग्निशमन खेळांसाठी यजमानपद मिळाले आहे. भारतने या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या आपल्या देशातील विस्तीर्ण क्रीडा पायाभूत सुविधांना मिळालेली जागतिक मान्यता आहे. "पोलिस, अग्निशमन आणि आपत्तीविषयक सेवांना एकत्रित करून 50 हून अधिक खेळांमध्ये स्पर्धा करणाऱ्या या कार्यक्रमाचे ठिकाण म्हणून अहमदाबादची निवड होणे हे क्रीडा स्थळ म्हणून शहराच्या वाढत्या प्रतिष्ठेचे द्योतक आहे."
2029 च्या प्रतिष्ठित जागतिक पोलिस आणि अग्निशमन खेळांसाठी भारताला यजमानपद मिळाले आहे, हा प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रतिष्ठित बोली जिंकणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या विस्तीर्ण क्रीडा पायाभूत सुविधांना मिळालेली जागतिक मान्यता आहे.
* * *
S.Patil/H.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140315)