सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील संपूर्ण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संविधान हत्या दिवस पाळण्यात आला

Posted On: 27 JUN 2025 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2025

 

भारतातील संपूर्ण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी 25 जून 2025 रोजी, संबंधित मुख्यमंत्री, राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या नेतृत्वाखाली संविधान हत्या दिवस पाळला. या कार्यक्रमाचा उद्देश्य बहुआयामी होता:

  • आणीबाणीचा प्रतिकार करणाऱ्या आणि लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे.
  • प्रदर्शने आयोजित करणे, सार्वजनिक चर्चासत्रे आणि चित्रफिती दाखवणे.
  • लोकशाही संस्थांची संवेदनशीलता आणि ताकदीवर पिढ्यांमध्ये संवाद साधणे

भारतातील लोकशाही ही केवळ राजकीय व्यवस्था नाही तर ती भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक रचनेत खोलवर रुजलेली एक नागरी संस्कृती आहे. संविधान हत्या दिवस हा केवळ भूतकाळातील अन्यायाची आठवण नाही तर लोकशाही तत्त्वे, संस्थात्मक पारदर्शकता आणि संवैधानिक मूल्यांप्रति असलेल्या आपल्या वचनबद्धतेची गहन पुष्टी आहे. चला आपण एक राष्ट्र म्हणून एकत्र येऊन आपली लोकशाही भक्कम करण्याचा आपला संकल्प प्रतिबिंबित करू, हा संकल्प कायम लक्षात ठेवू आणि या संकल्पाचे नूतनीकरण करूया. 

दिल्ली

   

संस्कृती मंत्रालय प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 50 प्रमुख ठिकाणी "लोकशाही चिरायू होवो " प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. हे प्रदर्शन पुढील काही आठवडे जनतेसाठी खुले राहणार आहे. 

दिल्ली- सेंट्रल पार्क

कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क येथे 'संविधान हत्या दिन' या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर उपस्थित होते.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित कार्यक्रमांच्या तपशीलांसाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा:

https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2025/jun/doc2025627577401.pdf

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2140267)