सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ‘एमएसएमई’ दिनानिमित्त दिनांक 27 जून 2025 रोजी आयोजित समारंभाचे अध्यक्षपद भूषवणार
Posted On:
26 JUN 2025 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 26 जून 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, दिनांक 27 जून 2025 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित ‘एमएसएमई दिन 2025 – उद्यमी भारत कार्यक्रमा’चे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितन राम मांझी, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांच्यासह संबंधित मंत्रालय आणि आयोगातील अनेक अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
एमएसएमई दिन 2025 निमित्त आयोजित कार्यक्रम, देशाची आर्थिक वृद्धी तसेच विकासात एमएसएमई क्षेत्राने दिलेल्या अमूल्य योगदानाची पोचपावती देण्याची संधी देण्याबरोबरच, अधिक लवचिक, स्पर्धात्मक आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या एमएसएमई क्षेत्रासाठी विविध उपक्रम सुरू करण्याचा मंचदेखील ठरेल.
***
S.Kulkarni/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2139853)