पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत प्रादेशिक परिस्थितीवषयी दूरध्वनीवरून चर्चा केली
प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य लवकर पुनर्स्थापित होण्यासाठी युद्ध तत्काळ थांबवणे, संवाद आणि मुत्सद्दीपणा हाच मार्ग असल्याचे पंतप्रधानांचे आवाहन
Posted On:
22 JUN 2025 3:36PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्राध्यक्ष, महामहीम डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी प्रादेशिक परिस्थिविषयी सविस्तर चर्चा केली.
या संभाषणादरम्यान, पंतप्रधानांनी नुकत्याच वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी संवाद आणि मुत्सद्दीपणाचे महत्त्व अधोरेखित केले. दीर्घकालीन प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी युद्ध थांबवणे आवश्यक असल्याचा आवाहनाचा पुनरुच्चारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
या संदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
इराणचे अध्यक्ष @drpezeshkian यांच्याशी संवाद साधला. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. नुकत्याच वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य लवकर पुनर्स्थापित होण्यासाठी युद्ध तत्काळ थांबवणे, संवाद आणि मुत्सद्दीपणा हाच मार्ग असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.
***
S.Patil/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138732)