पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जी 7 शिखर परिषदेत पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद


सामायिक प्राधान्यक्रमांना गती देण्यासाठी पंतप्रधानांचा ग्लोबल साऊथ नेत्यांशी संवाद

प्रविष्टि तिथि: 18 JUN 2025 5:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस येथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेत दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशी सार्थक आणि मनापासून संवाद साधला. त्यांनी ग्लोबल साऊथचे सक्रिय समर्थन करण्याप्रति भारताच्या अतूट वचनबद्धतेला दुजोरा दिला.

एक्स वरील ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या  पोस्टला उत्तर देताना, मोदी यांनी लिहिले:

"दोन प्रिय मित्र, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांच्याबरोबर मनमोकळा संवाद. ग्लोबल साऊथसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याविषयी, आमच्या वचनबद्धतेत आम्ही अविचल आहोत. एक चांगले राष्ट्र उभारण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यास आम्ही तितकेच कटिबद्ध आहोत." 

S.Bedekar/S.Kane/P.Malandkar

 


(रिलीज़ आईडी: 2137380) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam