पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतात पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्रांतीची 11 वर्षे अधोरेखित केली

Posted On: 11 JUN 2025 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2025

 

गेले दशकभराहून अधिक काळ देशाला समृद्धीच्या वाटेने नेणाऱ्या 11 वर्षांतील पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्रांतीचा उत्सव साजरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकास यात्रेतील महत्त्वाचा टप्पा अधोरेखित केला आहे. सुधारित जोडणी सुविधा, आर्थिक विस्तार आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ जीवनमान तसेच वाढीव समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या रेल्वे, महामार्ग, बंदरे आणि विमानतळ अशा सर्व क्षेत्रांमधील पायाभूत सुविधा क्षेत्रात भारताने घेतलेल्या प्रचंड भरारीवर पंतप्रधान मोदी यांनी अधिक भर दिला.

भविष्यवादी पायाभूत सुविधांना भारताने दिलेल्या चालनेमागे शाश्वतता आणि दीर्घकालीन दृष्टीकोन यांची प्रेरणा असून त्यातून आत्मनिर्भर भारताचा पाया रचला जात आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

एक्स मंचावर मायगव्हइंडिया ने पाठवलेल्या एका स्वतंत्र संदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान मोदी लिहितात:

“भारताच्या सुधारित विकासयात्रेत जोडल्या गेलेल्या उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह आता  #11YearsOfInfraRevolution झाली आहेत. रेल्वे ते महामार्ग, बंदरे ते विमानतळ अशा प्रत्येक ठिकाणी भारताचे वेगाने विस्तारणारे पायाभूत सुविधांचे जाळे ‘जीवनमानातील सुलभते’ला तसेच समृद्धीत भर घालण्याला चालना देत आहे.”

“भविष्यवादी पायाभूत सुविधांना भारताने दिलेल्या चालनेमागे शाश्वतता आणि दीर्घकालीन दृष्टीकोन यांची प्रेरणा आहे. यातून आत्मनिर्भर भारताचा पाया रचला जात आहे!

#11YearsOfInfraRevolution”

 

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2135840)