पंतप्रधान कार्यालय
‘जीपीडीआरआर 2025’ मध्ये भारताने जागतिक आपत्ती जोखीम कमी करण्यामध्ये लवचिकता आणणे आणि सार्वजनिक आरोग्याप्रति वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
जीपीडीआरआर 2025 मध्ये डॉ. पी. के. मिश्रा यांनी जी 20, जागतिक आरोग्य संघटना आणि आफ्रिकन युनियनबरोबर साधला संवाद
Posted On:
05 JUN 2025 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2025
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा आज जिनिव्हा येथे ‘जीपीडीआरआर म्हणजेच आपत्ती जोखीम कमी करण्याबाबत जागतिक मंच (ग्लोबल प्लॅटफॉर्म फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन) 2025 निमित्ताने आपत्ती जोखीम कमी करण्यावरील जी 20 देशांच्या कार्यगटाच्या गोलमेज परिषदेत सहभागी झाले. या चर्चेदरम्यान, त्यांनी विकासाच्या गरजांसोबत आर्थिक क्षमतेचा वापर करून जागतिक आपत्ती धोका कमी करण्याच्या प्रयत्नांना पुढे नेण्यात जी 20 च्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याचे आणि जागतिक आव्हानांविरुद्ध सामूहिक लवचिकता निर्माण करण्याचे आवाहन केले.
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, डॉ. मिश्रा यांनी लवचिक भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी वाढविण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.त्यांनी आफ्रिकन युनियनचे आपत्ती रोधक पायाभूत सुविधांच्या आघाडीचे नवीन सदस्य म्हणून स्वागत केले. यावेळी त्यांनी आफ्रिकन युनियनचे आयुक्त मोझेस विलाकाती आणि फ्रान्सचे ओएनयू जिनिव्हा येथील सीडीआरआय चे सह-अध्यक्ष प्रतिनिधी उपस्थित होते. 2023 मध्ये भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन युनियनचे कायमस्वरूपी जी 20 सदस्य म्हणून समावेश झाल्यानंतर अशा प्रकारची ही पहिलीच परिषद पार पडली.
डॉ. मिश्रा यांनी जिनेव्हा येथे जीपीडीआरआर च्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधॅनॉम घेब्रीयेसस यांचीही भेट घेतली. त्यांनी जागतिक सार्वजनिक आरोग्य बाबींवर डब्ल्यूएचओ सोबत भारताच्या सहकार्याबद्दल चर्चा केली. डिसेंबर 2025 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या दुसऱ्या डब्ल्यूएचओ जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेला भारताचा पाठिंबा असल्याचा मिश्रा यांनी पुनरुच्चार केला आणि गुजरातमधील जामनगर येथील डब्ल्यूएचओ जागतिक पारंपरिक औषध केंद्राप्रति भारताची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली.
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134401)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam