पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे भगवान महावीर वनस्थली उद्यानात वृक्षारोपण करून एक पेड माँ के नाम उपक्रमाला दिले बळ, अरावली ग्रीन वॉल प्रकल्पांतर्गत अरावली पर्वतरांगांचे पुनर्वनीकरण करण्याचा केला संकल्प

Posted On: 05 JUN 2025 3:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2025

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथील भगवान महावीर वनस्थळी उद्यानात वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाले आणि एक पेड माँ के नाम उपक्रमाला बळ दिले.पंतप्रधानांनी अरावली ग्रीन वॉल प्रकल्पांतर्गत अरावली पर्वतरांगांच्या पुनर्वनीकरणाचे महत्त्वही अधोरेखित केले.

जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक असलेली अरावली पर्वतरांग गुजरात, राजस्थान, हरयाणा आणि दिल्ली एवढ्या व्यापक क्षेत्रावर पसरली आहे,असे त्यांनी नमूद केले.

या क्षेत्रासमोर पर्यावरण विषयक अनेक आव्हाने असून, त्याचा सामना करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अरवली पर्वतरांगांमध्ये आणि त्यापलीकडे, विशेषतः शहरी आणि निम-शहरी भागात, जिथे जागेची कमतरता आहे, अशा ठिकाणी पारंपारिक लागवड पद्धतींव्यतिरिक्त, लागवडीच्या नवीन तंत्राला प्रोत्साहन दिले जाईल असे ते म्हणाले.मेरी LiFE पोर्टलवर वृक्षारोपण उपक्रमांचे जिओ-टॅगिंग आणि निरीक्षण केले जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशातील तरुणांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पृथ्वीचे हरित क्षेत्र वाढवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधानांनी X वर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:

आज,#जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, आम्ही एका विशेष वृक्षारोपण मोहिमेद्वारे #EkPedMaaKeNaam उपक्रमाला बळकटी दिली. दिल्लीमधील भगवान महावीर वनस्थळी उद्यानात मी एक रोप लावले. अरावली ग्रीन वॉल प्रकल्प- अरावली पर्वतरांगांचे पुनर्वनीकरण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे."

“हे सर्वज्ञात आहे की अरावली पर्वतरांगा, या आपल्या पृथ्वी ग्रहावरील सर्वात जुन्या पर्वतरांगा असून, त्यांनी गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली हा प्रदेश व्यापला आहे. गेल्या काही वर्षांत या क्षेत्राशी संबंधित अनेक पर्यावरण विषयक आव्हाने समोर आली आहेत, आणि त्याचा सामना करण्यासाठी  आमचे सरकार वचनबद्ध आहे. या पर्वत रांगांशी जोडलेल्या क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यावर आमचा भर आहे. आम्ही संबंधित स्थानिक प्रशासनाबरोबर काम करणार आहोत, आणि या ठिकाणची जल व्यवस्था सुधारणे, धुळीचे वादळ रोखणे, थार वाळवंटाचा पूर्वेकडे होणारा विस्तार थांबवणे, या आणि इतर गोष्टींवर भर देणार आहोत."

"अरावली पर्वतरांगांमध्ये आणि त्यापलीकडे, विशेषत: शहरी आणि निमशहरी भागात जेथे जागेची कमतरता आहे, त्या ठिकाणी पारंपारिक लागवड पद्धतींव्यतिरिक्त, आम्ही नवीन तंत्राला प्रोत्साहन देणार आहोत. मेरी LiFE पोर्टलवर वृक्षारोपण उपक्रमांचे जिओ-टॅगिंग आणि निरीक्षण केले जाईल. मी आपल्या देशातील युवा वर्गाला आवाहन करतो की त्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, आणि आपल्या पृथ्वी ग्रहाच्या हरित क्षेत्रात भर घालावी.”
 

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2134157)