पंतप्रधान कार्यालय
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये मॅग्नस कार्लसनवर पहिला विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधानांकडून गुकेशचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2025 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 च्या सहाव्या फेरीत मॅग्नस कार्लसनवर आपला पहिला विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुकेशचे अभिनंदन केले आहे.
“जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूविरोधात विजय मिळविल्याबद्दल त्याचे अभिनंदन! नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 च्या सहाव्या फेरीत मॅग्नस कार्लसनविरुद्ध मिळविलेला गुकेशचा पहिला विजय त्याच्या प्रतिभेची आणि कठोर मेहनतीची साक्ष देतो," असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी X वरील संदेशात म्हटले आहे,
“गुकेशचे असामान्य यश! जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूविरोधात विजय मिळविल्याबद्दल त्याचे अभिनंदन. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 च्या सहाव्या फेरीत मॅग्नस कार्लसनविरुद्ध मिळविलेला गुकेशचा पहिला विजय त्याच्या प्रतिभेची आणि समर्पणाची साक्ष देतो. पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा!”
@DGukesh
* * *
N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2133398)
आगंतुक पटल : 35
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada