गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालयाने सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील अधिकारी पदाच्या खालील पदावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी मानद पद - वरील पद - देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचा उद्देश शिपाई पासून ते उप-निरीक्षक या पदावरून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आत्म-सन्मान, अभिमान आणि मनोबल वाढवणे हा आहे.

सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील दीर्घ आणि प्रशंसनीय सेवेनंतर शिपाईपासून ते उप-निरीक्षक या पदांवरून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी कुठल्याही आर्थिक किंवा पेन्शन लाभाशिवाय मानद पद - एक वरचे पद देण्यात येईल

Posted On: 29 MAY 2025 7:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2025

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समधील अधिकारी पदाखालील  कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी मानद पद - एक वरचे पद  देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली  हा ऐतिहासिक निर्णय शिपाई पासून  ते उप-निरीक्षक या पदावरून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आत्मसन्मान , अभिमान आणि मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि आसाम रायफल्समधील दीर्घ आणि प्रशंसनीय सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या अधिकारी पदाखालील (कॉन्स्टेबल ते सब-इन्स्पेक्टर) कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी  कुठल्याही आर्थिक किंवा पेन्शन लाभाशिवाय   मानद पद - एक  वरचे पद देण्यात येईल.

मानद पद देण्यासाठी मुख्य पात्रता निकष, नियम आणि अटी खालीलप्रमाणे असतील:

पात्रता निकष

1.निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याने पदोन्नतीचे सर्व निकष पूर्ण केलेले असावेत.

2.कर्मचाऱ्याची सेवेतील कामगिरी चांगली आणि स्वच्छ असावी.

3. कर्मचाऱ्यांच्या मागील 5 वर्षांच्या APAR (वार्षिक कामगिरी मूल्यांकन अहवाल) चे मूल्यांकन किमान 'चांगले' असले पाहिजे.

4. कर्मचाऱ्यांना गेल्या 5 वर्षात कोणतीही मोठी शिक्षा झालेली नसावी.

5. कर्मचाऱ्यांची प्रामाणिकता निःसंदिग्ध असावी.

6. विभागीय चौकशी आणि दक्षता (DE/दक्षता) कडून मंजुरी अनिवार्य आहे.

अटी आणि शर्ती

1. संबंधित कमांडिंग ऑफिसरच्या शिफारशीनंतरच मानद पद प्रदान केले जाईल.

2. कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या दिवशी मानद पद प्रदान केले जाईल.

3. मानद पदासोबत कोणतेही आर्थिक किंवा पेन्शन लाभ देय  नसतील.

4. मानद पद  तेव्हाच प्रदान केले जाईल जेव्हा प्रदान केले जाणारे पद कर्मचारी ज्या श्रेणीतील आहेत त्या श्रेणीमध्ये असेल.

5. मानद पद दिल्यामुळे  कर्मचाऱ्यांच्या आंतर-सेवा  ज्येष्ठतेवर परिणाम होणार नाही.

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि आसाम रायफल्सच्या पात्र कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे मानद पदे प्रदान केली जातील:

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs)

आसाम रायफल्स (AR)

सेवानिवृत पद

मानद पद

सेवानिवृत पद

मानद पद

कॉन्स्टेबल

हेड कॉन्स्टेबल

राइफलमैन

हवालदार

हेड कॉन्स्टेबल

सहाय्यक उप निरीक्षक

हवालदार

वॉरंट अधिकारी

सहायक उप निरीक्षक

उप निरीक्षक

वॉरंट अधिकारी

नायब सुभेदार

उप निरीक्षक

निरीक्षक

नायब सुभेदार

सुभेदार

 

S.Kakade/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2132478)