पंतप्रधान कार्यालय
दिनांक 29 आणि 30 मे रोजी पंतप्रधान सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशला देणार भेट
‘सिक्कीम@50: उद्देशासह प्रगती आणि निसर्गातून वृद्धीची जोपासना’ या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार
पश्चिम बंगालमध्ये अलीपूरद्वार येथे अलीपूरद्वार तसेच कूचबिहार या जिल्ह्यांतील शहरी गॅस वितरण प्रकल्पाचा पंतप्रधानांच्या हस्ते कोनशीला समारंभ
पंतप्रधान बिहारमध्ये कारकत येथे 48,520 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ तसेच लोकार्पण
पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील कानपूर नगर येथे सुमारे 20,900 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ आणि उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
28 MAY 2025 10:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 आणि 30 मे रोजी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांना भेट देणार आहेत.
उद्या, दिनांक 29 मे रोजी पंतप्रधान सिक्कीम येथे जाणार असून तेथे सकाळी 11 वाजता ते ‘सिक्कीम@50: उद्देशासह प्रगती आणि निसर्गातून वृद्धीची जोपासना’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते सिक्कीममधील विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ तसेच उद्घाटन करतील तसेच उपस्थितांना संबोधित करतील.
त्यानंतर, पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालला प्रयाण करणार असून दुपारी सव्वादोनच्या सुमाराला अलीपूरद्वार येथे त्यांच्या हस्ते अलीपूरद्वार तसेच कूचबिहार या जिल्ह्यांतील शहरी गॅस वितरण प्रकल्पाचा कोनशीला समारंभ होईल.
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान बिहारला भेट देतील आणि संध्याकाळी पावणेसहा वाजता ते पाटणा विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील.
दिनांक 30 मे रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते कारकत येथे 48,520 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ तसेच लोकार्पण होईल. यावेळी ते एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतील.
त्यानंतर पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशला रवाना होतील आणि दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्यांच्या हस्ते कानपूर नगर येथे सुमारे 20,900 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ आणि उद्घाटन होईल. यावेळी ते सार्वजनिक सभेमध्ये उपस्थितांशी संवाद साधतील.
पंतप्रधानांची सिक्कीम भेट
सिक्कीम राज्यस्थापनेच्या वैभवशाली 50 वर्षांचा सोहोळा साजरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सिक्कीम@50: उद्देशासह प्रगती आणि निसर्गातून वृद्धीची जोपासना’ या कार्यक्रमात सहभागी होतील. सिक्कीम राज्य सरकारने “सुनाउलो, समृद्ध आणि समर्थ सिक्कीम” या संकल्पनेअंतर्गत आगामी वर्षभर सिक्कीमचे सांस्कृतिक वैभव, परंपरा, निर्सग शोभा आणि राज्याचा इतिहास यांचा उत्सव साजरा करणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या मालिकेचे आयोजन केले आहे.
या सिक्कीम भेटीत पंतप्रधानांच्या हस्ते तेथील विविध विकास कामांच्या प्रकल्पांचा कोनशीला समारंभ तसेच उद्घाटन देखील होणार आहे. या प्रकल्पांमध्ये नामची जिल्ह्यात साडेसातशे कोटी रुपयांहून अधिक खर्चासह 500 खाटांच्या नव्या रुग्णालयाची उभारणी; ग्यालशिंग जिल्ह्यातील पेलिंगमध्ये सांगचोईलिंग येथील प्रवासी रोपवेचे बांधकाम; गँगटोक जिल्ह्यातील सांगखोल येथील अटल अमृत उद्यानात भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याची उभारणी यांसह इतर अनेक कामांचा समावेश आहे.
सिक्कीम राज्यस्थापनेच्या 50 व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी स्मृत्यर्थ नाणे, स्मरणिका नाणे आणि टपाल तिकीट यांचे अनावरण देखील करण्यात येईल.
पंतप्रधानांची पश्चिम बंगाल भेट
भारतातील शहरी गॅस वितरण (सीजीडी) नेटवर्कचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालातील अलीपूरद्वार आणि कुचबिहार या जिल्ह्यांतील सीजीडी प्रकल्पांची कोनशीला उभारतील. सुमारे 1010 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह उभारला जाणारा हा प्रकल्प राज्यातील अडीच लाखांहून अधिक घरे, शंभरपेक्षा जास्त व्यावसायिक आस्थापना यांना पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा (पीएनजी) पुरवठा करण्याबरोबरच सरकारने नेमून दिलेल्या किमान कृती कार्यक्रम (एमडब्ल्यूपी) लक्ष्यांना अनुसरून 19 काँम्प्रेस्ड नैसर्गिक वायू (सीएनजी) केंद्रे स्थापन करून वाहनांच्या वाहतुकीसाठी सीएनजी पुरवण्याचे उद्दिष्ट देखील साधा करेल. या प्रकल्पामुळे सोयीस्कर, विश्वासार्ह, पर्यावरण-स्नेही आणि कमी खर्चाचा इंधन पुरवठा मिळणे शक्य होणार असून या भागात रोजगार संधी देखील निर्माण होणार आहेत.
पंतप्रधानांची बिहार भेट
दिनांक 29 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाटणा विमानतळ परिसरात नव्याने उभारलेल्या प्रवासी टर्मिनलचे उद्घाटन करतील. सुमारे 1200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नव्या टर्मिनलमध्ये वर्षभरात 1 कोटी प्रवाशांच्या हाताळणीची क्षमता आहे. या भेटीदरम्यान बिहता विमानतळ येथे उभारण्यात येणाऱ्या 1410 कोटी रुपये खर्चाच्या नव्या नागरी एन्क्लेव्ह इमारतीचा कोनशीला समारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल. पाटणाजवळ शैक्षणिक केंद्राच्या रुपात उदयाला येत असलेल्या आणि आयआयटी पटना तसेच प्रस्तावित एनआयटी पटना परिसराचा समावेश असलेल्या नगरासाठी हे बिहता विमानतळ उपयुक्त ठरणार आहे.
दिनांक 30 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते कारकत येथे 48,520 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, कोनशीला समारंभ तसेच लोकार्पण करण्यात येईल.
त्या प्रदेशातील विद्युत पुरवठा विषयक पायाभूत सुविधांना चालना देत, औरंगाबाद जिल्ह्यात 29,930 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह उभारण्यात येत असलेल्या नबीनगर सुपर औष्णिक उर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा (3x800 मेगावॉट) कोनशीला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पामुळे बिहार तसेच पूर्व भारतात उर्जा सुरक्षिततेची सुनिश्चिती होणार आहे. सदर प्रकल्पामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून नव्या रोजगार संधी निर्माण होतील आणि या भागाला परवडण्याजोग्या दरात वीज उपलब्ध होईल.
या प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधा आणि दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग- NH-119A, या पाटणा-आराह-सासाराम भागाच्या चौपदरी मार्गाची आणि वाराणसी-रांची-कोलकाता भागाच्या सहा-पदरी महामार्गाची (NH-319B)) आणि रामनगर-कच्ची दर्गा मार्गाच्या (NH-119D) आणि बक्सर आणि भरौली दरम्यान नवीन गंगा पुलाचे बांधकाम यासह विविध रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पांमुळे राज्यात अखंड सरळ जलदगती मार्ग तयार होतील आणि व्यापार आणि प्रादेशिक दळणवळणाच्या सुविधांत वाढ होईल.
यावेळी पंतप्रधान सुमारे 5,520 कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग - NH – 22, याच्या पाटणा - गया - दोभी विभागाच्या चौपदरी उन्नत महामार्गाचे उद्घाटन देखील करतील, तसेच राष्ट्रीय महामार्ग -NH–27,वरील गोपाळगंज टाउन येथील ग्रेड सुधारणांचे उद्घाटन देखील करतील.
देशभरातील रेल्वे पायाभूत सुविधा सुधारण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान सोन नगर - मोहम्मद गंज दरम्यान 1330 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा तिसरा रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित करतील.
पंतप्रधानाचा उत्तर प्रदेश दौरा
पंतप्रधान या प्रदेशातील पायाभूत सुविधा आणि दळणवळण वाढवण्याच्या उद्देशाने अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते 2,120 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या चुन्नीगंज मेट्रो स्टेशन ते कानपूर सेंट्रल मेट्रो स्टेशन विभागाचे उद्घाटन करतील. यात 14 नियोजित स्थानकांचा समावेश असेल ज्यामध्ये पाच नवीन भूमिगत स्थानके असतील जी शहरातील प्रमुख ठिकाणे आणि व्यावसायिक केंद्रांना मेट्रो नेटवर्कमध्ये समाविष्ट करतील. याव्यतिरिक्त, ते जी.टी.च्या रस्ता रुंदीकरण आणि मजबूतीकरण कामाचे उद्घाटन देखील करतील.
या प्रदेशातील वीज निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी, अनेक प्रकल्प हाती घेतले जातील. या प्रदेशाच्या वाढत्या ऊर्जेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पंतप्रधान यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण (YEIDA), अंतर्गत गौतम बुद्ध नगर येथे सेक्टर 28 मधील 220 केव्ही सबस्टेशनची पायाभरणी करतील. ते ग्रेटर नोएडा येथील इकोटेक-8 आणि इकोटेक 10 येथे 320 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 132 केव्ही सबस्टेशनचे उद्घाटन देखील करतील.
पंतप्रधान कानपूरमध्ये 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 660 मेगावॅटच्या पंकी औष्णिक वीज विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन करतील ज्यामुळे उत्तर प्रदेशची ऊर्जा क्षमता वाढेल. ते घाटमपूर येथील औष्णिक वीज प्रकल्पाच्या 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 660 मेगावॅट क्षमतेच्या तीन युनिट्सचे उद्घाटन देखील यावेळी करतील; ज्यामुळे वीज पुरवठ्यात लक्षणीय वाढ होईल.
पंतप्रधान कानपूरमधील कल्याणपूर पंकी मंदिर येथे पंकी पॉवर हाऊस रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे ओव्हर ब्रिज आणि पंकी रोडवरील पंकी धाम क्रॉसिंगचे उद्घाटन देखील करतील.यामुळे कोळसा आणि तेल याची वाहतूक सुलभपणे होईल हे सुनिश्चित होऊन पंकी औष्णिक वीज विस्तार प्रकल्पाच्या रसद पुरवठ्याला पाठिंबा मिळेल आणि त्यामुळे स्थानिक वाहतूक कोंडी कमी करेल.
कानपूरमधील बिंगवन येथे 290 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 40 MLD एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) तृतीय स्तरावरील प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान करतील. यामुळे प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होईल, ज्यामुळे या प्रदेशात जलसंवर्धन आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनाला चालना मिळेल.
या प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान कानपूर नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी गौरिया पाली मार्गाच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाची पायाभरणी करतील; आणि कानपूर नगर जिल्ह्यातील संरक्षण कॉरिडॉर अंतर्गत प्रयागराज महामार्गावरील नरवाल मोड (AH-1) ते कानपूर डिफेन्स नोड (4 लेन) यांना जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण, ज्यामुळे संरक्षण कॉरिडॉरसाठी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, लॉजिस्टिक्स आणि सुलभता वाढेल.
यावेळी पंतप्रधान आयुष्मान वय वंदना योजना, राष्ट्रीय उपजीविका अभियान आणि पंतप्रधान सूर्य घर मोफत बिजली योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि धनादेश देखील वितरित करतील.
***
JPS/SonalT/SanjanaC/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2131943)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Assamese
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada