पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी श्री एन. टी. रामाराव यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
28 MAY 2025 9:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री एन. टी. रामाराव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. "समाजाची सेवा करण्यासाठी तसेच गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल सर्वत्र त्यांची प्रशंसा केली जाते", असे मोदी म्हणाले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे
“एनटीआर गरु यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करत आहे. समाजाची सेवा करण्यासाठी तसेच गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या परीश्रमांबद्दल त्यांची सर्वत्र प्रशंसा केली जाते. त्यांचे चित्रपटसृष्टीतील काम देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असते. आम्ही सर्वजण त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतो."
माझे मित्र चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेशातील एनडीए सरकार एनटीआर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत आहे.
***
SonalT/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2131931)
आगंतुक पटल : 3
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam