माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा कुवेत दौरा (26-27 मे 2025)
Posted On:
25 MAY 2025 3:18PM by PIB Mumbai
भारताचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ, खासदार बैजयंत जय पांडा यांच्या नेतृत्वाखाली 26 ते 27 मे 2025 दरम्यान कुवेत दौऱ्यावर जाणार आहे.
विद्यमान खासदार, माजी मंत्री आणि भारताचे माजी परराष्ट्र सचिव यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे, या दौऱ्याचा उद्देश दहशतवादाच्या सर्व स्वरूपांबाबत भारताची एकसंध व ठाम भूमिका जागतिक पातळीवर अधोरेखित करणे हा आहे.
शिष्टमंडळातील सदस्य पुढीलप्रमाणे आहेत:
i) बैजयंत जय पांडा, लोकसभेचे खासदार; माजी राज्यसभा सदस्य
ii) डॉ. निशिकांत दुबे, लोकसभेचे खासदार, अध्यक्ष, संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान संबंधी समिती
iii) एस. फांग्नोन कोन्याक, राज्यसभेच्या खासदार, नागालँडमधून राज्यसभेत निवडून जाणाऱ्या पहिल्या महिला
iv) रेखा शर्मा, राज्यसभेच्या खासदार, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा
v) असदुद्दीन ओवैसी, लोकसभेचे खासदार, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष
vi) सतनाम सिंग संधू, राज्यसभेचे खासदार, चंदीगड विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू
vii) गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी राज्यसभा सदस्य
viii) हर्षवर्धन श्रृंगला, माजी परराष्ट्र सचिव, तसेच माजी राजदूत - अमेरिका, बांगलादेश व थायलंड
कुवेतमधील वास्तव्यात हे शिष्टमंडळ कुवेत सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, नागरिक समाजातील प्रमुख सदस्य, प्रभावशाली व्यक्तिमत्वे, विचारवंत संस्था, माध्यम प्रतिनिधी आणि अनिवासी भारतीय समाजातील विविध घटकांशी संवाद साधणार आहे.
***
S.Patil/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2131154)