पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला त्याची वैयक्तिक सर्वोत्तम भालाफेक साध्य केल्याबद्दल अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
17 MAY 2025 9:10AM by PIB Mumbai
नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग 2025 मध्ये 90 मीटर भालाफेकीचा टप्पा ओलांडल्याबद्दल तसेच त्याची वैयक्तिक सर्वोत्तम भाला फेक साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. हे त्याच्या अथक समर्पणाचे, शिस्तीचे आणि उत्कटतेचे परिणाम आहेत, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी त्यांच्या 'एक्स' या सामाजिक माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट म्हटले आहे की, "एक भव्य कामगिरी! दोहा डायमंड लीग 2025 मध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडल्याबद्दल आणि त्याची वैयक्तिक सर्वोत्तम भाला फेक साध्य केल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. हे त्याच्या अथक समर्पणाचे, शिस्तीचे आणि उत्कटतेचे परिणाम आहेत. भारताला याबद्दल आनंद आणि अभिमान आहे."
***
JPS/R.Dalekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2129280)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada