उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

व्यक्तीला स्वतःच सक्षम होण्यासाठी पाठबळ देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने सक्षमीकरण : उपराष्ट्रपती


जेव्हा महिला पुढे येतात तेव्हाच संतुलित आर्थिक विकास आणि सामाजिक वृद्धी होते : उपराष्ट्रपती

Posted On: 13 MAY 2025 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2025


मोफत योजना, भेटवस्तूंनी लोकांचे खिसे भरून होणारे सक्षमीकरण हे खरे सक्षमीकरण नाही. ती व्यक्ती स्वतः सक्षम व्हावी यासाठी त्या व्यक्तीला योग्य प्रकारे पाठबळ देणे हेच खरे सक्षमीकरण आहे. यातून आनंद मिळतो, समाधान मिळते, आंतरिक शक्ती मिळते आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा अभिमानही वाटतो,"असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. ते आज नवी दिल्लीत, मेघालयमधील गारो टेकड्या, खासी टेकड्या आणि जैंतिया टेकड्या या भागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  बचतगटाच्या सदस्यांना संबोधित करत होते.

'लुक इस्ट, ऍक्ट इस्ट' या धोरणांतर्गत झालेली प्रगती अधोरेखित करताना उपराष्ट्रपतींनी मेघालयमध्ये पर्यटन, खाणकाम, माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात प्रचंड क्षमता असल्यावर भर दिला.त्यांनी राज्याने  आर्थिक विकास आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली आणि केंद्र आणि राज्य स्तरावरील दूरदृष्टीच्या नेतृत्वाला त्याचे श्रेय दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गेल्या दशकात देशाने अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि महिलांचा विकास, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात जगाला हेवा वाटेल अशा प्रकारची कामगिरी केली आहे, असे ते म्हणाले.आपली आदिवासी संस्कृती तेजस्वी आहे, आपली आदिवासी संस्कृती आपला ठेवा आहे,असे त्यांनी सांगितले.

समावेशक वृद्धीवर आपले विचार व्यक्त करताना उपराष्ट्रपती म्हणाले,"राज्यात पर्यटन, खाणकाम, माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात प्रचंड प्रतिभा आणि क्षमता आहे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, मनुष्यबळाची जोपासना करणे आवश्यक आहे. मनुष्यबळ स्वतंत्र असले पाहिजे. आणि त्या श्रेणीतही, जेव्हा महिला पुढे येतात तेव्हा सामाजिक विकास आणि आर्थिक विकास संतुलित होतो. फिरत्या निधीच्या आणि त्याच्या आकारमानाच्या बाबतीत दहापट वाढ झाली आहे हे जाणून घेताना, मला अतिशय आनंद होत आहे आणि समाधान वाटत आहे."  

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरड संगमा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.


N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2128400)