पंतप्रधान कार्यालय
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2025 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
भारताच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक आत्म्याला आकार देण्यासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे स्मरण केले जाते, असे मोदी म्हणाले. मानवतावादावर भर असणारे कार्य त्यांनी केले आणि त्याच वेळी लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावनाही त्यांनी जागृत केली, असे मोदी पुढे म्हणाले.
“एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. भारताच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक आत्म्याला आकार देण्यासाठी त्यांचे प्रेमाने स्मरण केले जाते. त्यांच्या कामांनी मानवतावादावर भर दिला आणि त्याच वेळी लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत केली. शिक्षण आणि अध्ययन यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, शांतिनिकेतनचे संगोपन कसे केले यावरून दिसून येतात, ते देखील खूप प्रेरणादायी आहेत.”
* * *
N.Chitale/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2127895)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam