माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रकाश मगदूम यांनी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला

Posted On: 05 MAY 2025 5:18PM by PIB Mumbai

मुंबई, 5 मे 2025

 

प्रकाश मगदूम यांनी आज राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला.

प्रकाश मगदूम हे भारतीय माहिती सेवेचे 1999 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी अहमदाबाद येथे प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी), पत्र सूचना कार्यालय आणि सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनचे (सीबीसी) अतिरिक्त महासंचालक म्हणून काम पाहिले आहे.

मगदूम यांनी आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संचालक म्हणून काम पाहिले. या काळात भारताच्या सिने वारशाचे जतन, डिजीटायझेशन आणि पुनरुज्जीवन करत त्यांनी राष्ट्रीय  चित्रपट वारसा मोहिमेचे काम जारी राखले.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे रजिस्ट्रार आणि तिरुवनंतपुरम येथे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता  म्हणूनही त्यांनी काम केले.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127074) Visitor Counter : 41