माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी वेव्हज 2025 मध्ये भारताच्या लाईव्ह इव्हेंट्स अर्थव्यवस्थेबाबत श्वेतपत्रिका केली जारी
Posted On:
03 MAY 2025 6:40PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 3 मे 2025
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी "भारताची लाईव्ह इव्हेंट्स अर्थव्यवस्था: एक अत्यावश्यक धोरणात्मक वाढ" यावरील श्वेतपत्रिका जारी केली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुरू केलेली आणि वेव्हज 2025 च्या ज्ञान भागीदारांपैकी एक इव्हेंटएफएक्यूज मीडियाने तयार केलेली ही पहिलीच श्वेतपत्रिका आहे.
या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, वरिष्ठ आर्थिक सल्लागार आर. के. जेना; सहसचिव मीनू बत्रा; आणि सहसचिव (प्रसारण) प्रिथुल कुमार उपस्थित होते. ईव्हीए लाईव्ह आणि इव्हेंटएफएक्यूजचे व्यवस्थापकीय संचालक दीपक चौधरी देखील उपस्थित होते.
श्वेतपत्रिकेत भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या लाईव्ह मनोरंजन उद्योगाचे व्यापक विश्लेषण सादर केले आहे, ज्यामध्ये उदयोन्मुख कल, वाढीचे मार्ग आणि या क्षेत्राच्या निरंतर उत्क्रांतीसाठी धोरणात्मक शिफारसी अधोरेखित केल्या आहेत.
भारताच्या लाईव्ह इव्हेंट्स परिसंस्थेत - एक विखंडित क्षेत्र ते देशाच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा रचनात्मक आणि प्रभावशाली स्तंभ असे परिवर्तन होत आहे. 2024 ते 2025 हा कालावधी एक निर्णायक टप्पा आहे, ज्यामध्ये 'कोल्डप्ले' सारखे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम अहमदाबाद आणि मुंबईत सादर होत आहेत; यातून जागतिक स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन करण्याची भारताची तयारी दिसून येते.
या क्षेत्रातील प्रमुख ट्रेंडमध्ये इव्हेंट टुरिझमचा उदय समाविष्ट आहे, ज्यात जवळपास पाच लाख प्रेक्षक विशेषत्वाने प्रत्यक्ष संगीत कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी प्रवास करतात. हे एका मजबूत संगीत-पर्यटन अर्थव्यवस्थेच्या उदयाचे संकेत आहेत. - व्हीआयपी अनुभव, क्युरेटेड ॲक्सेस आणि लक्झरी हॉस्पिटॅलिटी यासारख्या प्रीमियम तिकीट विभागात वर्षागणिक 100% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, जी अनुभव-केंद्रित प्रेक्षकांचे वाढते प्रमाण सूचित करते. बहु-शहर पर्यटन आणि प्रादेशिक उत्सवांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे श्रेणी-2 शहरांमधील सहभाग वाढला आहे.
नोकऱ्या आणि प्रतिभा विकास या क्षेत्राच्या वाढत्या प्रभावात देखील ही गती प्रतिबिंबित होते. थेट मनोरंजन हा आता भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचा एक दुय्यम भाग नाही तर ते एक धोरणात्मक उत्तोलक आहे जे रोजगाराला आणि कौशल्य विकासाला चालना देते. सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कार्यक्रमांमुळे साधारणपणे प्रत्येकी अंदाजे 2000 ते 5000 तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण होतात, ज्यामुळे उपजीविकेला आधार देण्यात आणि गतिमान कार्यबल वाढवण्यात या क्षेत्राची वाढती भूमिका अधोरेखित होते.
या कार्यक्रमात माहिती प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले स्टॅटिस्टिकल हँडबुक ऑन मीडिया अँड एंटरटेनमेंट सेक्टर 2024-25, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) द्वारे 'फ्रॉम कंटेंट टू कॉमर्स: मॅपिंग इंडियाज क्रिएटर इकॉनॉमी', अर्न्स्ट अँड यंग द्वारे 'अ स्टुडिओ कॉल्ड इंडिया' आणि खेतान अँड कंपनी द्वारे 'लीगल करंट्स: अ रेग्युलेटरी हँडबुक ऑन इंडियाज मीडिया अँड एंटरटेनमेंट सेक्टर 2025' यासारख्या प्रमुख अहवालांचे प्रकाशन देखील झाले.
केंद्रित गुंतवणूक, धोरणात्मक सहयोग आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांसह, भारत 2030 पर्यंत जागतिक स्तरावरील शीर्ष पाच थेट मनोरंजन स्थळांपैकी एक म्हणून स्वतःला स्थापित करण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती, पर्यटन आणि वाढता जागतिक सांस्कृतिक सहभागासाठी नवीन मार्ग उघडे होतील.
* * *
PIB Mumbai |S.Nilkanth/Sushma/Shraddha/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126541)
| Visitor Counter:
24