WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

जागतिक बौद्धिक संपदा (आयपी) परिसंस्थेत परिवर्तनाची गरज; आयपी सर्व देशांसाठी रोजगार, विकास आणि नवोन्मेषासाठी उत्प्रेरक म्हणून काम करते: डॅरेन टांग, महासंचालक, डब्ल्यूआयपीओ


वेव्हज 2025 मध्ये "दृकश्राव्य कलाकार आणि आशय निर्मात्यांसाठी बौद्धिक संपदा (आयपी) आणि कॉपीराइटची भूमिका" या विषयावरील सत्राने माहितीपूर्ण संवादाला दिली चालना

 Posted On: 01 MAY 2025 9:25PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 1 मे 2025

 

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद  (वेव्हज) मध्ये आज "दृकश्राव्य  कलाकार आणि आशय निर्मात्यांसाठी  आयपी आणि कॉपीराइटची भूमिका" यावर पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली होती.  डिजिटल युगात निर्मात्यांना सक्षम बनवण्यात बौद्धिक संपदा (आयपी) अधिकारांच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी जागतिक मनोरंजन, कायदा  आणि सर्जनशील उद्योगांमधील प्रभावशाली व्यक्ती  या सत्रात एकत्र आल्या होत्या.

या पॅनेलने कायद्याशी संबंधित बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले आणि विशेषत: कलाकार आणि आशय निर्माते , ज्यांचे काम अनधिकृत वापर आणि शोषणासाठी असुरक्षित आहे, त्यांच्यासाठी आयपी अधिकारांबद्दल अधिक जागरूकता आणि संरक्षणाची तातडीची गरज अधोरेखित केली.

ज्येष्ठ वकील अमित दत्ता यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले आणि तज्ञ आणि निर्मात्यांच्या प्रतिष्ठित  पॅनेलदरम्यान चर्चेला गती दिली.  पॅनेलमध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचे (डब्ल्यूआयपीओ) महासंचालक. डॅरेन तांग यांचा समावेश होता, ज्यांनी धोरणात्मक चौकटी आणि जगभरातील कलाकारांसाठी संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी डब्ल्यूआयपीओच्या प्रयत्नांबाबत जागतिक दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले की गेल्या 5  दशकांमधील भारताचा बौद्धिक संपदाविषयक  प्रवास असामान्य   आहे आणि त्याची सर्जनशील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आयपी सर्व देशांसाठी रोजगार, विकास आणि नवोन्मेषासाठी  उत्प्रेरक म्हणून काम करते त्यामुळे जागतिक आयपी परिसंस्थेत परिवर्तन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. डब्ल्यूआयपीओच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या डेटा मॉडेलबद्दल बोलताना ते म्हणाले की ते धोरणकर्ते, अर्थतज्ज्ञ आणि त्याच्या सदस्य देशांच्या निर्मात्यांना सर्जनशील अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्यासाठी चांगली मोजमाप प्रणाली शोधण्यास मदत करत आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाटककार फिरोज अब्बास खान यांनी रंगभूमीतील अनेक दशकांच्या त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि मूळ सर्जनशील कलाकृती जपताना येणाऱ्या आव्हानांमधून अनेक अंतरंग उपस्थितांसोबत सामायिक केले. ते म्हणाले, की बौद्धिक संपदा हा मानवी प्रतिष्ठेचा भाग आहे आणि समाजाने सर्वप्रथम कलाकारांच्या कामाचा आदर केला पाहिजे.

प्रसिद्ध चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माते स्टीव्ह क्रोन यांनी दृकश्राव्य कथाकथनामधील योगदानाचे संरक्षण करण्यासाठी कॉपीराइटचे महत्त्व आणि प्रमाणित जागतिक अंमलबजावणी यंत्रणेची आवश्यकता यांवर भर दिला. ते म्हणाले, की कॉपीराइट केवळ कमाईसंदर्भात नाही, तर निर्मात्यांच्या कामांचे शोषण होऊ नये यासाठी नियंत्रण म्हणून गरजेचे आहे.

ज्येष्ठ पटकथालेखक अंजुम राजाबली यांनी सर्जनशील प्रक्रियेबद्दल आणि गुंतागुंत वेगाने वाढणाऱ्या आशय अर्थव्यवस्थेत लेखकांनी त्यांचे हक्क समजून घेण्याची, तसेच त्यांच्या अधिकारांवर दावा करण्याची आवश्यकता याबद्दल विचार व्यक्त केले. ते म्हणाले, की आज कशाचाही अ‍ॅक्सेस मिळणे खूपच सोपे झाले आहे, पण त्यावर निर्बंध असले पाहिजेत.

संपूर्ण सत्रात, पॅनेलवरील सदस्यांनी कॉपीराइट मालकी, परवाना, नैतिक अधिकार, एआयचा प्रभाव आणि वेगाने डिजिटलाइझ होत असलेल्या जगात प्रवेश आणि संरक्षण यांच्यातील संतुलन यावर सखोल चर्चा केली.

 

* * *

PIB Mumbai | JPS/Sushma/Parnika/D.Rane


Release ID: (Release ID: 2125962)   |   Visitor Counter: 28