WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

संस्कृती असा सशक्त दृष्टिकोन आहे ज्याद्वारे जाहिरात माध्यमे प्रेक्षकांचे अवलोकन आणि अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करू शकतात: प्रेम नारायण


संस्कृती म्हणजे जाहिरात माध्यम उभारणीतील इंधन - वेव्हज 2025 मध्ये ओगिल्वीच्या प्रेम नारायण यांचा मास्टरक्लासमधील विचार

 Posted On: 01 MAY 2025 7:55PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 1 मे 2025

 

वेव्हज 2025 च्या उद्घाटनाच्या दिवशी, ओगिल्वी जाहिरात कंपनीचे मुख्य धोरण अधिकारी प्रेम नारायण यांनी जाहिरात माध्यम उभारणीवरील (ब्रँड-बिल्डिंग) आकर्षक 'मास्टरक्लास' घेतला, ज्यामध्ये भारतीय ग्राहकांना भावणारे ब्रँड तयार करण्यासाठी संस्कृतीचा उपयोग कसा करता येईल, याबद्दल सखोल विचार मांडण्यात आले. 

"संस्कृती म्हणजे माध्यम उभारणीतील इंधन" या शीर्षकाच्या त्यांच्या सत्रात, नारायण यांनी दर्जेदार कथांना आकार देण्यात तसेच ग्राहकांच्या वर्तनावर प्रभाव पाडण्यात सांस्कृतिक प्रासंगिकतेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. भारतातील जाहिराती या सांस्कृतिक परंपरांमध्ये स्वतःला कसे रुजवून विकसित झाल्या आहेत आणि सांस्कृतिक मूल्यांशी जुळणारे ब्रँड कसे कायमस्वरूपी ग्राहक निष्ठा मिळवण्याची शक्यता जास्त आहे, हे त्यांनी विशद केले. 

'कॅडबरी'च्या जाहिरात प्रवासाचे उदाहरण उद्धृत करताना, नारायण यांनी स्पष्ट केले की, या खोलवर रुजलेल्या ब्रँडने आधुनिक अभिव्यक्ती म्हणून चॉकलेटला स्थान देऊन 'मिठा' (गोड) च्या भारतीय परंपरेत स्वतःला कसे यशस्वीरित्या सामावून घेतले. या सांस्कृतिक संरेखनामुळे ब्रँडला भारतीय घरांमध्ये एक अद्वितीय आणि चिरस्थायी जागा निर्माण करण्यास मदत केली, उत्सवी आणि दैनंदिन क्षणांची पुनर्परिभाषा केली.

या सत्रात ब्रँड फायदे देण्यासाठी सांस्कृतिक अंतर्दृष्टी प्रभावीपणे आकर्षित करणाऱ्या इतर मोहिमा देखील अधोरेखित केल्या, उदाहरणांमध्ये CEAT चे सुरक्षा संदेश आणि 'फेविकॉल'चे विनोदी पण, सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत कथाकथन यांचा समावेश होता. या दोन्हीमुळे ब्रँडची आठवण आणि भावनिक संबंध द्विगुणित झाले आहेत.

नारायण यांनी यावर भर दिला की, "ब्रँड आकर्षण" निर्माण करणे हे उत्पादन वैशिष्ट्यांपलीकडे आहे - त्यासाठी ब्रँडला सांस्कृतिक रचनेत अंतर्भूत करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, भारतीय आदरातिथ्याचे प्रतीक म्हणून चहाची साधी कल्पना विविध ब्रँड्सनी गाठीभेटी आणि ओळखीवर भर देण्यासाठी सर्जनशीलपणे वापरली आहे, ज्यामुळे ब्रँडचा अनुभव अधिक जवळीकतेचा आणि हृदयस्पर्शी बनतो.यावेळी नारायण यांनी प्रादेशिक संवेदनशीलतेनुसार संवाद साधण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले.

भारताच्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेसह, प्रादेशिक सानुकूलन ब्रँडिंगमध्ये केवळ प्रभावीच नाही तर आवश्यक आहे.

या कार्यक्रमात सांस्कृतिक प्रसंग आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाने व्यवसाय वाढीसाठी नवीन संधी कशा खुल्या होतात यावर प्रकाश टाकण्यात आला. शाहरुख खानचा सहभाग असलेले कॅडबरीच्या “माय अॅड” मोहिमेचे उदाहरण, अति-व्यक्तिगत जाहिरातींचे मॉडेल म्हणून सांगण्यात आले. ही मोहीम डिजिटल साधनांचा वापर करून तळागाळापर्यंत पोहोचते आणि सामायिक सांस्कृतिक क्षणांना संबोधित करते.

डिजिटल आणि सामाजिक व्यासपीठे सांस्कृतिक संकेतांनी समृद्ध आहेत, त्यांचा उपयोग अधिक संदर्भानुरूप तसेच प्रभावी कथनासाठी केला जाऊ शकतो, असेही नारायण यांनी नमूद केले. त्यांनी ट्रकचालकांसाठी राबवलेल्या 'आय टेस्ट मेनू' अभियानाचा उल्लेख केला, या अभियानाने केवळ विशिष्ट प्रेक्षकांसाठी व्यक्तिगत स्तरावर संदेश प्रसारित केले नाहीत, तर प्रत्यक्ष सामाजिक परिणामही साधला. आतापर्यंत 42 हजाराहून अधिक ट्रकचालकांना या अभियानाचा लाभ झाला आहे, असेही त्यांनी सांगितले; ज्याद्वारे ब्रँड आपल्या लक्ष्यित प्रेक्षकांना समजून घेऊ शकतात, आणि व्यक्तिगत पातळीवर अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करू शकतात. संस्कृती अशा प्रकारे प्रभावी माध्यम आहे, असा विचार नारायण यांनी सत्राचा समारोप करताना ठामपणे मांडला. या सत्रामध्ये जाहिरातीच्या माध्यमातूनप्रेक्षकांच्या भाषेत, त्यांच्या परंपरांविषयी आणि आकांक्षांविषयी संवाद साधून फक्त 'भारतामध्ये' नव्हे तर, 'भारतासोबत' वाढण्यासाठी ब्रँड्सना एक मार्गदर्शिका दिली.

 

* * *

PIB Mumbai |S.Nilkanth/Vasanti/Nikhilesh/D.Rane


Release ID: (Release ID: 2125902)   |   Visitor Counter: 30