माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज 2025 मध्ये ॲनिमे, मांगा, वेबटून्स आणि कॉस्प्लेमधील अस्सल भारतीय आयपींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी समर्पित वॅ डब्ल्यूएएम या भारताच्या पहिल्या राष्ट्रीय उपक्रमाची अंतिम फेरी रंगणार
वेव्हज डब्ल्यूएएमच्या अंतिम विजेत्यांना प्रतिभावंत निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी असलेल्या क्रिएटर डेव्हलपमेंट ग्रांटचा मिळणार लाभ
Posted On:
29 APR 2025 6:17PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 29 एप्रिल 2025
गेल्या अनेक महिन्यांच्या प्रादेशिक स्तरावरील स्पर्धा आणि हजारो स्पर्धकांच्या सादरीकरणा नंतर, वेव्हज ॲनिमे अँड मांगा स्पर्धे (वॅम !) मध्ये सहभागी होण्यासाठी भारतातील 11 शहरांमधील स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली असून, मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 1 ते 4 मे 2025 दरम्यान वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद 2025 मध्ये स्पर्धेची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरी होणार आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया (एमईएआय) च्या सहकार्याने आयोजित केलेला डब्ल्यूएएम (WAM), हा ॲनिमे, मांगा, वेबटून्स आणि कॉस्प्लेमधील अस्सल भारतीय आयपींचा शोध, संगोपन आणि प्रचार करण्यासाठी समर्पित असलेला भारताचा पहिला राष्ट्रीय उपक्रम आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या या सृजनशील उपक्रमांना आणि त्यांच्या निर्मात्यांना वेव्हज 2025 या ऐतिहासिक उपक्रमात शिकण्याची मोठी संधी मिळेल. हा उपक्रम भारताच्या सृजनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जागतिक स्तरावरील दिग्गज, नवोन्मेशी, स्टुडिओज आणि सृजक यांना एकत्र आणेल. 'क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या वेव्ह्जचे उद्दीष्ट, भारतीय निर्मात्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम करणे, हे आहे. एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्र, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी या क्षेत्रांसाठी वेव्हज हे भारतातील सर्वात मोठे व्यासपीठ आहे. क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) स्पर्धा, वेव्हजच्या केंद्रस्थानी आहे. सीआयसीच्या सीझन 1 ने 1 लाख नोंदणीचा इतिहास नोंदवला असून, यात 1,100 आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश आहे. व्यापक निवड प्रक्रियेनंतर, 32 आगळ्या आव्हानांमधून 750 हून अधिक अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.
भारतातील नवोदित निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, क्रंचीरोल हा जागतिक ॲनिमे ब्रँड चाहत्यांची ॲनिमेसाठीची आवड आणि प्रेम वाढवण्यासाठी डब्ल्यूएएम ! (वेव्हज ॲनिमे अँड मंगा स्पर्धा) 2025 मध्ये टायटल स्पॉन्सर म्हणून सहभागी झाला आहे. क्रन्चीबॉलने डब्ल्यूएएमच्या (WAM!) 2025 च्या विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी क्रिएटर डेव्हलपमेंट ग्रँट (निर्माते विकास अनुदान) सादर केले आहे. ॲनिमे, मंगा आणि वेबटून क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकार आणि कथाकारांना मदत करणे, हे या अनुदानाचे उद्दिष्ट आहे कारण ते जागतिक प्रेक्षकांसाठी अस्सल बौद्धिक संपदा (आयपी) विकसित करतात.
क्रिएटर डेव्हलपमेंट ग्रँट चे तपशील:
- मांगा (विद्यार्थी श्रेणी) - 25,000 रुपये
- मांगा (व्यावसायिक श्रेणी) - 25,000 रुपये
- वेबटून (विद्यार्थी श्रेणी) - 25,000 रुपये
- वेबटून (व्यावसायिक श्रेणी) - 25,000 रुपये
- ॲनिमे (विद्यार्थी श्रेणी) - 50,000 रुपये
- ॲनिमे (व्यावसायिक श्रेणी) - 50,000 रुपये

याशिवाय क्रॅन्चिरोल, डब्ल्यूएएम 2025 या स्पर्धेच्या अंतीम विजेत्या भारतीय चमूला सहाय्य करेल, जो टोकियोमध्ये होणार्या ॲनिमे जपान 2026 या जगातील प्रमुख ॲनिमे प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व करेल. या पाठबळामुळे भारताची अस्सल सृजनशील प्रतिभा जागतिक स्तरावर प्रदर्शित होण्यासाठी सहाय्य मिळेल. क्रन्चिरोल एलएलसी हा अमेरिकेतील सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट आणि जपानच्या सोनी म्युझिक एंटरटेनमेंट (जपान) ची उपकंपनी असलेल्या अनिप्लेक्स यांनी स्वतंत्रपणे चालवलेला संयुक्त उपक्रम आहे. या दोन्ही कंपन्या टोकियोमधील सोनी समूहाच्या उपकंपन्या आहेत.

वेव्हज (WAVES)
भारत सरकारद्वारे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी मोलाचा टप्पा ठरणारी पहिली वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली आहे.
आपण उद्योग व्यावसायिक, गुंतवणूकदार निर्माते, अथवा इनोव्हेटर (नवोन्मेशी) असाल, ही परिषद एकमेकांशी जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, आणि नवोन्मेषासाठी आणि एम अँड ई परिप्रेक्ष्यात योगदान देण्यासाठी आगळे जागतिक व्यासपीठ मिळवून देईल.
वेव्हज, कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे (तंत्रज्ञान नवोन्मेष) केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावून, भारताच्या सृजनशील प्रतिभेला बळ देईल. ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनेरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर), व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर), आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एक्सआर), हे उद्योग आणि क्षेत्र परिषदेच्या केंद्रस्थानी असतील.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
ताज्या घोषणांसाठी पीआयबी टीम वेव्हजच्या संपर्कात रहा
* * *
PIB Mumbai | N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2125239)
| Visitor Counter:
14