नागरी उड्डाण मंत्रालय
हवाई क्षेत्रावरील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुविधा, सुरक्षितता आणि नियामक अनुपालनाची खात्री करण्यासाठी वाढीव प्रवासी सुविधा सज्जता लागू करण्याचे सरकारचे विमान कंपन्यांना निर्देश
Posted On:
26 APR 2025 1:04PM by PIB Mumbai
अलीकडील आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंदी आणि ओव्हरफ्लाइट निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, अनेक उड्डाण मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे उड्डाण कालावधी वाढला आहे आणि अतिरिक्त तांत्रिक थांबे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची सुविधा, सुरक्षितता आणि नियामक अनुपालनाची सुनिश्चिती करण्यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) यांनी सर्व विमान कंपन्यांना त्वरित प्रभावाने वाढीव प्रवासी हाताळणीचे उपाय लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रमुख उपायांमध्ये हे समाविष्ट आहे:
पारदर्शक संवाद: प्रवाशांना मार्गातील बदल, वाढलेला प्रवास वेळ आणि त्यांच्या प्रवासादरम्यान कोणत्याही तांत्रिक थांब्यांविषयी माहिती दिली पाहिजे. हा संवाद चेक-इन, बोर्डिंग आणि डिजिटल अलर्टद्वारे केला पाहिजे.
उड्डाणातील सेवांमध्ये वाढ: विमान कंपन्यांना वास्तविक ब्लॉक वेळेच्या आधारे केटरिंगमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून संपूर्ण उड्डाणात पुरेसे अन्न, पाणी आणि विशेष जेवणाची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे, यात तांत्रिक थांब्याचाही समावेश आहे.
वैद्यकीय तयारी: विमान कंपन्यांनी विमानात वैद्यकीय बाबींचा पुरवठा पुरेसा आहे याची खात्री करावी आणि संभाव्य तांत्रिक थांब्यावर आपत्कालीन सेवांची उपलब्धता पडताळावी.
ग्राहक सहयोग सज्जता : कॉल सेंटर आणि ग्राहक सेवा पथकांनी विलंब, हाताळण्यासाठी आणि लागू नियमांनुसार आवश्यकतेनुसार मदत किंवा भरपाई देण्यासाठी सज्ज असले पाहिजे.
कार्यात्मक समन्वय: उड्डाण कार्यान्वयन, ग्राहक सेवा, ग्राउंड हँडलिंग, इनफ्लाइट सेवा आणि वैद्यकीय भागीदारांमध्ये अखंड समन्वय आवश्यक आहे.
सर्व विमान कंपन्यांना हे निर्देश अनिवार्य मानण्यास सांगण्यात आले आहे. या निर्देशांचे पालन न केल्यास लागू असलेल्या नागरी विमान वाहतूक आवश्यकता (CAR) अंतर्गत नियामक कारवाई होऊ शकते. हे निर्देश तात्काळ लागू झाले आहेत आणि पुढील सूचना येईपर्यंत ते लागू राहतील.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2124528)
Visitor Counter : 26