पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
25 APR 2025 2:34PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक वाटचालीतील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत अत्यंत परिश्रमपूर्वक काम केले, भारताच्या अवकाश कार्यक्रमाला नव्या उंचीवर नेले असे पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करताना आणि भारतातील शिक्षण अधिक समग्र तसेच भविष्याला अनुसरून असावे याची सुनिश्चिती करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांकरता भारत नेहमीच डॉ. कस्तुरीरंगन यांचा ऋणी राहील. ते अनेक तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शक देखील होते, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक वाटचालीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या, डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने मी खूप व्यथित झालो आहे. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि राष्ट्रासाठी दिलेले निःस्वार्थ योगदान कायमच स्मरणात राहील.
त्यांनी इस्रोमध्ये अत्यंत परिश्रमपूर्वक काम केले, भारताच्या अवकाश कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेले, ज्याची अवघ्या जगानेही दखल घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाकांक्षी उपग्रह प्रक्षेपण झाले आणि नवोन्मेषावर भर दिला गेला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करताना आणि भारतातील शिक्षण अधिक समग्र आणि भविष्याला अनुसरून असावे याची सुनिश्चिती करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांकरता भारत कायमच डॉ. कस्तुरीरंगन यांचा ऋणी राहील. ते अनेक तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शक देखील होते.
त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, शास्त्रज्ञ आणि असंख्य चाहत्यांसोबत माझ्या सहवेदना आहेत. ओम शांती.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2124264)
आगंतुक पटल : 69
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam