सांस्कृतिक मंत्रालय
जागतिक वारसा दिनानिमित्त 18 एप्रिल 2025 रोजी एएसआय स्मारकांमध्ये प्रवेश शुल्क माफ
Posted On:
17 APR 2025 7:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2025
जागतिक स्तरावर साजऱ्या होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे दिवसानिमित्त', 18 एप्रिल रोजी भारतातील एएसआय स्मारकांना भेट देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी घोषणा एएसआय अर्थात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने केली आहे.
या उपक्रमाचा उद्देश पर्यटकांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. देशातील 3,698 स्मारके आणि स्थळे संरक्षित करून, एएसआय देशाच्या ऐतिहासिक वारशाविषयी आणि अतुलनीय स्थापत्यकलेविषयी जाणून घेण्याची संधी यानिमित्ताने देत आहे.
या वर्षी 'आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे दिवसाची' ची संकल्पना 'आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात आलेला वारसा', अशी आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती, धोके किंवा संघर्षांपासून वारसा स्थळांचे संरक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा यामागचा उद्देश आहे.
प्रवेशशुल्क माफ करण्यामुळे, आपल्या मूर्त वारशाचे संवर्धन व व्यवस्थापन याविषयी अधिक लोकजागृती आणि आपल्या वारसा संवर्धनात नागरिकांची सक्रिय भूमिका याविषयी जाणीवजागृती करण्यात साहाय्य मिळू शकेल, अशी एएसआयची अपेक्षा आहे.
आपल्या संविधानात घालून दिलेल्या मूलभूत कर्तव्यांनुसार, या अमूल्य वारसा स्थळांचे संरक्षण करणे आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आपले योगदान देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.


* * *
N.Chitale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122531)
Visitor Counter : 26