माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज 2025 च्या क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत अँटी-पायरसी चॅलेंजसाठी अव्वल सात अंतिम स्पर्धकांची घोषणा
अँटी-पायरसी चॅलेंजला उद्योगजगत आणि सहभागींकडून प्रचंड प्रतिसाद
देशभरातील स्टार्टअप्स, तंत्रज्ञान प्रदाते, संशोधन संस्था आणि विद्यार्थ्यांकडून 1,600 हून अधिक नोंदणी आणि 132 कल्पना दाखल
Posted On:
16 APR 2025 8:42PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 16 एप्रिल 2025
वेव्हज (वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट) 2025 च्या क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 1 अंतर्गत एक अग्रगण्य उपक्रम असलेल्या अँटी-पायरसी चॅलेंजच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांची घोषणा करण्यात आली आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 1-4 मे 2025 दरम्यान मुंबईत वेव्हज शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.
फिंगरप्रिंटिंग आणि वॉटरमार्किंग सोल्यूशन्समध्ये तांत्रिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित अँटी-पायरसी चॅलेंजला उद्योगजगत आणि सहभागींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. 12 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झालेल्या या आव्हानाची संकल्पना डिजिटल पायरसीविरुद्धच्या लढाईत मेक इन इंडिया तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने करण्यात आली होती. या आव्हानामध्ये देशभरातील स्टार्टअप्स, तंत्रज्ञान प्रदाते, संशोधन संस्था आणि विद्यार्थ्यांकडून 1,600 हून अधिक नोंदणी आणि 132 कल्पना दाखल झाल्या. कठोर बहु-स्तरीय तपासणी आणि मूल्यांकन प्रक्रियेनंतर यापैकी 15 कल्पनांची निवड करण्यात आली आणि आता एका सन्माननीय ज्युरी पॅनेलने केलेल्या सखोल मूल्यांकनानंतर डिजिटल कंटेंट सुरक्षेतील त्यांच्या आविष्कारात्मक नवकल्पनांसाठी 7 उत्कृष्ट अंतिम स्पर्धक उदयास आले आहेत.
1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ सेंटर येथे होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) 2025 दरम्यान अंतिम ज्युरी आणि थेट प्रेक्षकांसमोर अव्वल सात अंतिम स्पर्धक त्यांचे उपाय सादर करतील. विजेत्यांना शिखर परिषदेच्या ग्रँड फिनालेमध्ये सन्मानित केले जाईल.
अंतिम फेरीतील स्पर्धक आणि त्यांचे उपाय:
पथकाचे नाव
|
प्रस्तावित उपाय
|
उपायाबद्दल संक्षिप्त तपशील
|
एझोवी इन्फोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
|
स्टील्थगार्ड
|
एक ऑफलाइन साधन जे मीडिया फाइल्समध्ये मजबूत, लपलेले वॉटरमार्क एम्बेड करते, जे कंप्रेशन किंवा फॉरमॅट बदलांनंतरही ट्रेस करता येते.
|
अॅटमस्टेट
|
मॉंक डीबी
|
रिअल-टाइमसाठी फिंगरप्रिंटिंग आणि वॉटरमार्किंग वापरून एआय-नेटिव्ह वेक्टर डेटाबेस कंटेंट पडताळणी आणि पायरसी डिटेक्शन.
|
न्यूरोनिक्स
|
न्यूरोट्रेस
|
एन्क्रिप्शन, लायसन्सिंग सर्टिफिकेट, ॲक्सेस कंट्रोल, डायनॅमिक वॉटरमार्किंग आणि पायरेसी डिटेक्शन यांचा समावेश असलेला एक व्यापक व्हिडिओ प्रोटेक्शन सूट.
|
गार्डियन्स ऑफ ओरिजिनॅलिटी
|
पायरेटएक्स
|
अनधिकृत पोहोच आणि बेकायदेशीर वितरणापासून मल्टीमीडिया कंटेंट सुरक्षित करण्यासाठी डिझाइन केलेली एक प्रगत डीआरएम आणि अँटी-पायरेसी प्रणाली.
|
हमिंगबर्ड
|
ट्रायम्बाका
|
ब्लॉकचेन-संचालित सोल्युशन टँपर-प्रूफ कंटेंट प्रोटेक्शनसाठी ब्लाइंड वॉटरमार्किंग आणि क्रिप्टोग्राफिक हॅशिंग एकत्रित करते.
|
सायफरकोअर
|
सुरक्षित फिंगरप्रिंट स्टेगॅनोग्राफी सिस्टम (एसएफएसएस)
|
डिजिटल मीडियामध्ये सुरक्षित फिंगरप्रिंट्स एम्बेड करण्यासाठी स्टेगॅनोग्राफी आणि क्रिप्टोग्राफिक तंत्रांचा वापर करणारी एक प्रणाली, ज्यामुळे मजबूत पायरेसी प्रतिबंध शक्य होतो.
|
व्हाइट हॅट लव्हर्स
|
शॅडो स्टॅम्प
|
रिअल टाइममध्ये डिजिटल कंटेंटचे निरीक्षण आणि ट्रेस करण्यासाठी अदृश्य, अद्वितीय, ओळखण्यायोग्य मार्कर वापरणारी मार्कर-आधारित ट्रॅकिंग सिस्टम.
|
आव्हानाचे ठळक मुद्दे:
- फिंगरप्रिंटिंग, वॉटरमार्किंग, ब्लॉकचेन आणि स्टेगॅनोग्राफी यासारख्या प्रगत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे
- स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान नवोन्मेषकांचा वैविध्यपूर्ण सहभाग
- उद्योग तज्ञ आणि तंत्रज्ञांचा समावेश असलेल्या प्रतिष्ठित ज्युरींद्वारे निर्णय
- राष्ट्रीय मान्यता, मार्गदर्शन आणि उद्योगजगताच्या सहकार्याच्या संधी मिळविण्यासाठी उपाय जिंकणे
आजच्या वेगाने विकसित होणाऱ्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात डिजिटल सामग्रीची सुरक्षा, अखंडता आणि सत्यता संरक्षित करणे पूर्वीपेक्षा अधिक महत्वाचे झाले आहे. डिजिटल मीडिया वापराचे प्रमाण वाढल्याने पायरसी, अनधिकृत वितरण तसेच सामग्री हाताळणीचा धोका वाढला असून त्यामुळे सामग्री निर्माते, वितरक आणि हक्क धारकांसमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत.
मीडिया पार्टनर्स एशियाच्या अहवालानुसार 2024 मध्ये भारतात 90 दशलक्ष वापरकर्ते ऑनलाइन व्हिडिओ पायरसीमध्ये गुंतले होते, ज्यामुळे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे संभाव्य नुकसान झाले. परिणामकारक मजबूत पायरसी विरोधी हस्तक्षेप नसल्यास 2029 पर्यंत ही संख्या 158 दशलक्ष वापरकर्त्यांपर्यंत वाढू शकते.
हक्कधारक आणि प्रसारक त्यांचे आयपी अधिकार ओळखण्यासाठी, डिसरप्ट करण्यासाठी तसेच अंमलात आणण्यासाठी तांत्रिक उपायांवर अधिकाधिक अवलंबून आहेत. तथापि, प्रमुख पायरसी साइट्स आणि सेवांमागील गुन्हेगारी सिंडिकेट सतत त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करत आहेत आणि त्यांना ओळखणे अवघड करण्यासाठी धूसर करत आहेत, ज्यामुळे पायरसी शोधण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची कामगिरी पूर्वीपेक्षा अधिक जटिल होत आहे.
फिंगरप्रिंटिंग आणि वॉटरमार्किंग सोल्युशन्समध्ये तांत्रिक नवोन्मेषांना चालना देण्यासाठी डिझाइन केलेली ही स्पर्धा भारताच्या डिजिटल परिसंस्थेला सुरक्षित करण्याची वाढती निकड दर्शवते.
अँटी-पायरसी चॅलेंज हा भारताच्या डिजिटल भविष्याचे रक्षण करण्याच्या तसेच महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रात स्वदेशी नवोन्मेषांना प्रोत्साहन देण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
सीआयआयने वेव्हजचा भाग म्हणून आयोजित केलेल्या या चॅलेंजला आयपीहाऊस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि हॅक2स्किल यांनी पाठिंबा देऊन मूल्यांकन प्रक्रियेत आणि संपूर्ण आव्हानातील उद्योगजगताचा सहभाग सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
पीआयबी टीम वेव्हजच्या नवीनतम घोषणांसह अद्यतनित रहा
या, आमच्यासोबत प्रवास करा! वेव्हजसाठी आत्ताच नोंदणी करा
* * *
PIB Mumbai | S.Patil/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2122257)
| Visitor Counter:
34
Read this release in:
English
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam