माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेवेक्स 2025 (WAVEX 2025) मधील सहभागासाठी पात्रतेच्या निकषांचा विस्तार, अर्ज दाखल करण्याची मुदत 21 एप्रिलपर्यंत वाढवली
फ्लॅगशिप मीडिया-टेक स्टार्टअप इव्हेंट मध्ये जुन्या उपक्रमांना प्रवेश देण्याच्या निर्णयाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
Posted On:
16 APR 2025 8:12PM
|
Location: Mumbai
मुंबई, 16 एप्रिल 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (एमआयबी) इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) च्या सहयोगाने माध्यम आणि मनोरंजन तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी भारतातील प्रमुख व्यासपीठ ठरणाऱ्या वेवेक्स 2025 (WAVEX 2025) बाबतच्या दोन ठळक घडामोडी जाहीर केल्या आहेत. या परिषदेत व्यापक सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी, पात्रतेच्या निकषांचा विस्तार करण्यात आला असून, अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
आता 2016 आणि त्यानंतर स्थापन झालेले स्टार्टअप्स वेवेक्स 2025 साठी अर्ज करायला पात्र ठरतील. यापूर्वी 2020 आणि त्यानंतर स्थापन झालेल्या स्टार्टअप्ससाठी प्रवेश खुला होता. पूर्वीच्या निकषांमध्ये हा महत्वाचा बदल आहे. या निर्णयामुळे सहभागींचा व्यापक समूह आकर्षित होईल, अशी अपेक्षा आहे, विशेषत: ज्यांनी मीडिया-टेक क्षेत्रात लवचिकता, विकास आणि प्रभाव प्रदर्शित केला आहे.
देशभरातील उद्योजकांचे सहभागामधील स्वारस्य आणि त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत अर्ज करण्याची अंतिम मुदत देखील 21 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे इच्छुक मीडिया-टेक इनोव्हेटर्सना (माध्यम तंत्रज्ञान नवोन्मेशी) त्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर काम करण्याची संधी मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित वेव्हज 2025 शिखर परिषदेदरम्यान 2 आणि 3 मे रोजी वेव्हज 2025 गुंतवणूक चर्चासत्र होईल. वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचा (वेव्हज), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेमधील एक फ्लॅगशिप कार्यक्रम असलेला वेवेक्स (WAVEX), गेमिंग, अॅनिमेशन, एक्सआर, मेटाव्हर्स, जनेरेटिव्ह एआय आणि कंटेंट टेक्नॉलॉजी यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्स साठी हाय-स्टेक लाँचपॅड बनण्यासाठी सज्ज आहे.
निवड झालेले स्टार्टअप्स क्लोज्ड रूम पिचिंग (बंद खोलीतील चर्चा) सत्रांमध्ये सहभागी होतील आणि टॉप व्हेंचर कॅपिटल फर्म्स (मोठे भागभांडवल असलेल्या कंपन्या) आणि हाय-प्रोफाईल एंजल गुंतवणूकदारांचे लक्ष वेधतील. त्यांना उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञांचे मार्गदर्शन, जागतिक भागधारकांशी संपर्क आणि तंत्रज्ञान आणि माध्यम क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांबरोबर सहयोग करण्याची संधी देखील मिळेल.
वेवेक्स 2025 (WAVEX 2025) हे केवळ उदयोन्मुख कल्पनांचे प्रदर्शन करण्यासाठी नव्हे, तर डिजिटल युगात सामग्रीची निर्मिती, वितरण आणि त्याचा आर्थिक लाभ या प्रक्रियेला चालना देणारे धोरणात्मक व्यासपीठ म्हणून डिझाइन करण्यात आले आहे.
आपले अर्ज वेवेक्स (WAVEX) च्या पुढील अधिकृत पोर्टल वर दाखल करावेत: https://wavex.wavesbazaar.com.
वेवेक्स (WAVEX)
भारत सरकारद्वारे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत महाराष्ट्रात मुंबई येथे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणारी पहिली वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली आहे.
आपण उद्योग व्यावसायिक असाल, गुंतवणूकदार, निर्माते, अथवा इनोव्हेटर (नवोन्मेषकार) असाल, तर ही परिषद एकमेकांशी जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, आणि नवोन्मेषासाठी तसेच एम अँड ई परिप्रेक्ष्यात योगदान देण्यासाठी आगळे जागतिक व्यासपीठ मिळवून देईल.
वेव्हज, कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे (तंत्रज्ञान नवोन्मेष) केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावून, भारताच्या सृजनशील प्रतिभेला बळ देईल. ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनेरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर), आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर), हे उद्योग आणि क्षेत्र परिषदेच्या केंद्रस्थानी असतील.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
ताज्या घोषणांसाठी पीआयबी टीम वेव्हजच्या संपर्कात रहा
चला, आमच्याबरोबर प्रवासाला! वेव्हससाठी लगेच नोंदणी करा
* * *
PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2122244)
| Visitor Counter:
Visitor Counter : 18
Read this release in:
Odia
,
English
,
Malayalam
,
Gujarati
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu