पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ऑलिम्पिक पदकविजेत्या प्रसिद्ध क्रीडापटू कर्णम मल्लेश्वरी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

प्रविष्टि तिथि: 15 APR 2025 9:37AM by PIB Mumbai

ऑलिम्पिक पदकविजेत्या प्रसिद्ध क्रीडापटू कर्णम मल्लेश्वरी यांनी काल यमुनानगर येथे  पंतप्रधानांची भेट घेतली. युवा क्रीडापटूंना मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. 

पंतप्रधान मोदी यांनी X वर पोस्ट केले आहे : 

''यमुनानगर येथे काल ऑलिम्पिक पदकविजेत्या प्रसिद्ध क्रीडापटू कर्णम मल्लेश्वरी यांच्याशी भेट झाली. त्यांनी मिळवलेल्या यशाचा भारताला अभिमान आहे. त्याचसोबत युवा क्रीडापटूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे प्रयत्नही कौतुकास्पद आहेत. ''

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2121732) आगंतुक पटल : 61
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam