माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज् एक्सआर क्रिएटर हॅकेथॉन विजेत्यांनी शाळा, चिकीत्सालये, घरे आणि त्यापलिकडील विश्वात केला नवोन्मेषाचा समावेश
पाच विजेते संघ आपले एक्सआर प्रकल्प वेव्हज् परिषदेत सादर करणार
द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमधील एक्सआर नवोन्मेषकांची संख्या अधिक
Posted On:
10 APR 2025 10:45PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 10 एप्रिल 2025
भारतातील सर्वोत्तम एक्सटेन्डेड रिऍलिटी (एक्सआर) नवोन्मेषक त्रिमितीय विज्ञान प्रयोगशाळा ते वॉर गेम्स अशा वैविध्यपूर्ण नवकल्पनांमधून आपले शिक्षण, आरोग्य, खरेदी आणि पर्यटन याबाबतच्या संकल्पना पुन्हा नव्याने सादर करत आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिटचा (वेव्हज्) एक भाग म्हणून सुरू केलेल्या आणि वेव्हलॅप्सच्या सहयोगाने आयोजित केलेल्या क्रिएट इन इंडिया स्पर्धेच्या पहिल्या सत्राचा भाग असलेल्या एक्सआर क्रिएटर हॅकेथॉन स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्रिमितीय तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने आयोजित हॅकेथॉन स्पर्धेची आरोग्यसेवा-स्वास्थ्य आणि कल्याण, शैक्षणिक परिवर्तन, त्रिमितीय आभासी पर्यटन, डिजिटल माध्यमे व मनोरंजन आणि इ कॉमर्स किरकोळ क्षेत्रात परिवर्तन या पाच संकल्पनांमध्ये विभागणी करण्यात आली होती.
भारतभरातील 2200 पेक्षा अधिक स्पर्धकांनी हॅकेथॉनसाठी नांवनोंदणी केली होती. स्पर्धेतील तीन मूल्यांकन फेऱ्यांनंतर पाच संघ विजेते म्हणून घोषित करण्यात आले. विविध शहरे आणि संस्थांमधून आलेले विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजकांचा यामध्ये समावेश आहे. यू ट्यूब लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे आयोजित विनर्स सेरेमनी या समारंभात विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.
विजेते संघ व त्यांचे प्रकल्प याबाबत सविस्तर माहिती
1) ‘शैक्षणिक परिवर्तन’ संकल्पनेअंतर्गत एक्सआर रनर्स संघ आणि त्यांचा ‘एज्युस्केप एक्सआर’ प्रकल्प विजेते ठरले

आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला हा व्हीआर आधारित मंच विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातील प्रयोग वास्तवदर्शी आणि त्रिमितीय तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्याची मुभा देतो. यासाठी हँड ट्रॅकिंग आणि एआय आधारित अभिप्रायांची मदत घेतली जाते. अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळांचा अभाव असतो, या समस्येवर पर्याय देण्याचे काम हा मंच करतो. “देशाच्या अनेक भागांमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोग करुन न पाहताच विज्ञानाचे शिक्षण घेतात. आम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे आणि आमचा प्रकल्प आभासी वास्तवदर्शी मंचाद्वारे एसटीइएम प्रात्यक्षिकांची सुविधा पुरवून शिक्षणामध्ये क्रांती घडविण्याच्या उद्देशाने साकार करण्यात आला आहे,” असे वेदांत हाजरा या संघाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्याने सांगितले. साहिल पटेल आणि शौर्य बारनवाल हे त्याचे साथीदार आहेत.
2) ‘हेल्थकेअर, फिटनेस आणि वेल-बीईंग’ या संकल्पना गटातील विजेता संघ ‘कॉग्निहॅब’चा प्रकल्प ‘कॉग्निहॅब’

कॉग्निहॅब ही एक्सआर-वर आधारित प्रणाली लेझी आय (एक नेत्रविकार), स्ट्रोक आणि चिंताविकार या व्याधींमधून बाहेर पडणाऱ्यांसाठी पुनर्वसन उपाययोजना सुचविते. “वास्तविक वैद्यकीय परिस्थिती दरम्यान परिणामांची पाहणी करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. या हॅकेथॉनने आमची भूमिका अधिक स्पष्टपणे घडविण्यासाठी आणि नव्या हितधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली,” असे संघ प्रमुख ऋषभ कपूर यांनी सांगितले. संघात एक्सआर-वर आधारित आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेल्या पिंटू कुमार आणि इतर सदस्यांचा समावेश आहे.
3) ‘इमर्सिव टुरिझम’ या संकल्पना गटातील विजेता संघ ल्यूमएक्सआर, त्यांचा प्रकल्प ‘इमर्सिव ट्रॅवल गाईड’ सोबत

ल्यूमएक्सआर’ने एक मिश्र-रिअॅलिटी टुरिझम गाईड देणारी प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये वापरकर्त्यांना आभासी तंत्रज्ञानाधारे पर्यटनस्थळे शोधण्याची सुविधा आहे. त्यातून त्रिमितीय नकाशा, ड्रोनने केलेले छायाचित्रण आणि चलतचित्रफीतींचा अनुभव घेता येतो. या प्रणालीमुळे प्रवासाच्या नियोजनाची प्रक्रिया आकर्षक आणि कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा आहे. या मंचावर पर्यटनाशी संबंधित वस्तू विक्रेत्यांना पारंपरिक पत्रके किंवा चित्रफितींच्या पलीकडे जाऊन एक्सआर-आधारित जाहिरात करण्याची संधी आहे. “हे केवळ एक प्रवासी अॅप नाही, तर एक गुंतवून टाकणारे सांस्कृतिक कथन आहे. आमच्या प्रकल्पाच्या साहाय्याने वापरकर्ते पर्यटनस्थळाचा आभासी अनुभव घेऊन मग नियोजन करू शकतील,” असे ल्यूमएक्सआरचे संघ प्रमुख सॅव्हिओ यांनी सांगितले.
4) ‘ई-कॉमर्स आणि रिटेल ट्रान्सफॉर्मेशन’ या संकल्पना गटातील विजेता संघ ईएमओ, त्यांच्या ‘हेवन इस्टेट’ प्रकल्पासह

हेवन इस्टेट हे अॅप वापरकर्त्यांना घरसजावटीसाठी खरेदी करण्याआधी एआर आणि त्रिमिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घर सजावटीचा नमुना पाहण्याची सुविधा देते. ग्राहक आणि घर सजावट व्यावसायिक यांच्यातील सहकार्याला प्राधान्य देण्याच्या हेतूने ही प्रणाली विकसित केली आहे. या मंचावर प्रमाणित व्यावसायिक त्यांच्या सजावटीच्या संकल्पना अपलोड करू शकतात आणि ग्राहक स्वतःच्या जागेत त्याचा नमुना पाहू शकतात. “आम्हाला घरमालक आणि व्यावसायिकांना जोडणारा थेट दुवा निर्माण करायचा होता,” असे ईएमओ संघाचे प्रमुख उत्कर्ष राय यांनी सांगितले. संघात हिमांशू महतो, आशुतोष मिश्रा व इशिता गुआर यांचा समावेश आहे. हॅकेथॉनमधील मार्गदर्शनाच्या टप्प्यामुळे संकल्पना आणि वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यास मदत झाल्याचे संघ ईएमओने सांगितले.
5) ‘डिजिटल मीडिया अँड एंटरटेनमेंट’ या संकल्पनेचे विजेते टीम युथ बझ त्यांच्या ‘इमर्सिव्ह वॉरफेअर सिम्युलेटर’ या प्रकल्पासह

युथ बझने द गेम ऑफ डायमेंशन्स तयार केले, हा एक मल्टीप्लेअर टॅक्टिकल वॉर गेम आहे जो व्हीआर (व्हर्च्युअल रिॲलिटी) हेडसेट आणि मोबाईलवर खेळता येतो, जो एक इमर्सिव्ह गेमप्ले देतो. “आम्हाला प्लॅटफॉर्म आणि रिॲलिटीजमध्ये गेमिंग अनुभव एकत्रित प्रदान करायचा होता,” असे संघ प्रमुख मोहित कुमार शर्मा म्हणाले. त्यांच्या संघामध्ये अनिश डोंबाळे, ए शिवम राज आणि यश साधुखान यांचा समावेश आहे.
XR इनोव्हेटर्स टियर 2 आणि 3 शहरांमधून येत आहेत
हॅकॅथॉनमध्ये चेंगलपेट, मणिपाल आणि वेरावळसह टियर 2 आणि 3 शहरांमधील 66% लोकांनी सहभाग नोंदवला. सहभागींमध्ये 17 ते 35 वर्षे वयोगटातील लोक होते. अंतिम फेरीत सहभागी झालेल्या 40 संघांपैकी 53% विद्यार्थी, 33% कार्यरत व्यावसायिक तर 14% स्वयंरोजगार असलेले उद्योजक होते. विशेष म्हणजे, अंतिम फेरीत सहभागी झालेल्यांपैकी 19% महिला होत्या - XR नवोन्मेषातील वाढत्या लिंगभाव विविधतेचे हे एक मजबूत सूचक आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, वेव्हलॅप्स आणि भारतXR आणि XDG हे दोन आघाडीचे XR समुदाय यांच्या पाठिंब्याने अंतिम फेरीतील स्पर्धक आता जागतिक स्तरावर पाऊल ठेवत आहेत, जिथे वर्गखोल्या, वसतिगृहे आणि होम स्टुडिओमध्ये जन्माला येणाऱ्या कल्पना लवकरच जागतिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचू शकतात. विजेत्यांची घोषणा झाली असली तरी XR क्रिएटर हॅकेथॉन अद्याप संपलेली नाही. सर्व पाचही संघ आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत आयोजित केलेल्या वेव्हज समिट - जागतिक मीडिया आणि मनोरंजन कार्यक्रमात त्यांचे प्रकल्प प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत.
"XR क्रिएटर हॅकेथॉन केवळ नवोन्मेषाला चालना देत नाही तर ती एका नवीन डिजिटल भारताचा पाया रचत आहे. आपण कसे शिकतो, बरे होतो, प्रवास करतो आणि कसे जोडतो हे पुन्हा परिभाषित करण्याचे काम हे उपाय करतील", असे वेव्हलॅप्सचे संस्थापक आणि सीईओ आशुतोष कुमार म्हणाले.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
पीआयबी टीम वेव्हजकडून अद्ययावत घोषणा प्राप्त करा
आताच वेव्हजसाठी नोंदणी करा.
* * *
PIB Mumbai | M.Pange/Surekha/Reshma/Nandini/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2120807)
| Visitor Counter:
38